Sindhudurg: सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले बंदरात बोट उलटून 7 खलाशी बुडाले

Sindhudurg: वेंगुर्ला बंदरात रात्री बर्फाची वाहतूक सुरु असताना ही घटना घडली आहे. वादळी वाऱ्यामुळे ही बोट भरकटली होती.
Vengurle port
Vengurle portesakal

वेंगुर्ले : येथिल बंदर येथे रात्री बुडालेली होडी आज सकाळी मूठ येथील समुद्रात सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आढळली असून ती मच्छीमारांनी वेंगुर्ले बंदरात आणली आहे.  या होडी मध्ये एकूण ७ खलाशी होते यातील ४ खलाशी बेपत्ता होते तर तिघांनी पोहत किनारा गाठला. नंदा ठाकू हरिक्रांता ( वयः ४९,) राजा कोल (वयः २९ )व सचिन कोल अशी बचावलेल्याची नावे आहेत.

बुडालेल्या चार खलाशांपैकी रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेरकर (वय  ६६ ) यांचा मृतदेह मोचेमाड समुद्रात मिळाला आहे. पोलिसांनी तो मच्छीमारांच्या सहाय्याने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.

बेपत्ता  खलाशांच्या शोधसाठी कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टर व बोटीद्वारे शोध कार्य सुरू आहे. बंदरावर सर्व विभागांचे अधिकारी तसेच तहसीलदार ओकार ओतारी, फिशरीजचे अधिकारी रवींद्र मालवणकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित आहेत.बेपत्ता असलेल्यामध्ये मध्यप्रदेश येतील आझान मुनीलाला कोल (वयः १६), चांद गुलाम महम्म्द, व शिवराम कोल यांचा समावेश आहे.

Vengurle port
Dombivli Blast: "माझ्या पत्नीचा मृतदेह तिच्या अंगठीने ओळखला"; डोंबिवली स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या रिद्धीच्या पतीचा दुःखद अनुभव

तर काल अकोलेमधील अहमदनगर-प्रवरा नदीत एसडीआरफची बोट उलटली आहे.एका बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एसडीआरफ पथकाची बोट उलटली. या बोट दुर्घटनेत ५ जण बुडाले. तिघांचा मृत्यू झाला तर दोघांचा शोध सुरु आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ आता समोर आला आहे.

Vengurle port
Pune Porsche Accident: 'कारमध्ये 4 जण होते, ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला'; पुणे पोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com