मालवणच्या समुद्रकिनारी एकाचवेळी ७५ डॉल्फिनचा कळप, ड्रोनने टिपले दुर्मिळ आणि विहंगम दृश्य; पाहा VIDEO

Dolphins in Malvan : तारकर्ली-देवबाग समुद्रपट्ट्यात डॉल्फिनचे दर्शन नेहमी घडत असले, तरी एवढ्या मोठ्या संख्येने कळप एकत्र फिरताना प्रथमच स्पष्टपणे दिसून आल्याचे सांगितले जात आहे. याचा ड्रोन व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
Stunning Marine View From Malvan Coast Goes Viral

Stunning Marine View From Malvan Coast Goes Viral

Esakal

Updated on

मालवणमधील किनाऱ्यावर रविवारी एकाचवेळी सुमारे ७५ डॉल्फिनचा कळप दिसल्याची नोंद झाली असून पर्यटकांसह स्थानिकांसाठी हे अत्यंत दुर्मीळ आणि रोमांचक दृश्य ठरले आहे. तारकर्ली-देवबाग समुद्रपट्ट्यात डॉल्फिनचे दर्शन नेहमी घडत असले, तरी एवढ्या मोठ्या संख्येने कळप एकत्र फिरताना प्रथमच स्पष्टपणे दिसून आल्याचे सांगितले जात आहे. सागरी जीव अभ्यासक विशाल भावे यांनी या कळपाचे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात टिपले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com