निसर्ग वादळातील नुकसानग्रस्त दिव्यांगांना 75 लाख 

75 Lakhs To Disabled Persons Affected By Storm Ratnagiri Marathi News
75 Lakhs To Disabled Persons Affected By Storm Ratnagiri Marathi News
Updated on

दाभोळ (रत्नागिरी) - जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या एक कोटी निधीपैकी 75 लाख रुपये निसर्ग चक्रीवादळामध्ये बाधित झालेल्या दापोली व मंडणगड तालुक्‍यातील दिव्यांगांना समप्रमाणात देण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दापोली दौऱ्यात केली. 

दापोली नगरपंचायत सभागृहात शासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा सभेत त्यांनी निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कामांची माहिती घेतली तसेच पुढील काळात करावयाच्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात 1 कोटीचा निधी आहे.

निसर्ग चक्रीवादळात बाधीत झालेल्या दापोली व मंडणगड तालुक्‍यातील दिव्यांगाना 75 लाख रुपये समप्रमाणात देण्यात येणार असून दिव्यांगांच्या बॅंक खात्यात ते जमा करण्यात येणार आहेत. 25 लाख रुपये इतर तालुक्‍यांसाठी ठेवण्यात आले आहेत. अशा प्रकारे समाजल्याणमधून प्रथमच वाटप करण्यात येणार आहेत. दापोलीचे आमदार योगेश कदम, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा उपस्थित होते. 

सिमेंटच्या पत्रे उत्पादकांशी आमदार योगेश कदम व आपले बोलणे झाले असून या दोन्ही तालुक्‍यात 55 हजार पत्रे मागविण्यात येणार असून ते प्रशासनामार्फत गावागावात पोचविले जाणार असून या पत्र्यांची ज्यांना आवश्‍यकता आहे. त्यांना ते विकत देण्यात येणार आहेत. मात्र बाजारभावापेक्षा त्याची किंमत कमी असणार आहे. 
- उदय सामंत, पालकमंत्री 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com