रत्नागिरीत रूग्णसंखेत पुन्हा वाढ ; आज 79 नवे कोरोना बाधित

 राजेश शेळके 
Wednesday, 14 October 2020

जिल्हा आरोग्य यंत्रणेने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत.

रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढल्याने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. एका दिवसात 538 चाचण्या झाल्या. त्यामध्ये 79 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 8 हजार 144 झाली आहे तर 59 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 298 झाली आहे. मृत्यूदर गेले चार ते पाच दिवस स्थिर आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाचे चांगले परिणाम दिसत आहेत. लक्षणे असलेल्यांची माहिती आरोग्य यंत्रणेकडे तत्काळ जाऊन त्यांच्यावर उपचार होत आहेत. त्यामुळे हा फैलाव थांबला आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटली होती; मात्र आज 79 रुग्ण सापडून संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये आरटीपीसीआरमध्ये 27 तर अँटिजेन चाचणीत 52 रुग्ण सापडले. मंडणगड 1, दापोली 2, खेड 5, गुहागर 1, चिपळूण 27, संगमेश्‍वर 6, रत्नागिरी 11, लांजा 26 रुग्ण सापडले. सर्वाधिक रुग्ण चिपळूण आणि लांजा तालुक्यात सापडले आहेत. 
गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसातील मृत दोन्ही महिला आहेत. त्यामध्ये एक रत्नागिरी आणि दुसरी संगमेश्‍वर तालुक्यातील आहे. मृत्यूदर 3. 65 टक्के झाला आहे. दिवसभरात 59 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे बरे होणार्‍यांची संख्या 7 हजार 274 झाली आहे. हे प्रमाण आता 89.31 टक्केवर गेले आहे. जिल्ह्यात उपचाराखालील रुग्णांची संख्या 422 आहे. 

हे पण वाचातीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

 एकूण बाधित रुग्ण        8,144

* निगेटिव्ह रुग्ण          44,093
* बरे झालेले रुग्ण          7,274
* एकूण मृत रुग्ण              298
* उपचाराखालील रुग्ण        422

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 79 New corona case in ratnagiri