तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

राजेश शेळके
Wednesday, 14 October 2020

बिबट्या विहिरीत पडला होता. विहीर सुमारे 35 ते 40 फूट खोल आहे.

रत्नागिरी - तालुक्यातील गणपतीपुळे-भगवतीनगर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान मिळाले. वनविभाग, स्थानिक, ग्रामपंचायत, पोलिस आदींच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडून त्याला बाहेर काढण्यात आले. त्याची तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. 

गणपतीपुळे-भगवतीनगर येथील रामरोडनजीक राहणार्‍या दिनेश धोडींराम बापट याच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. याची माहिती निवेंडीचे पोलिस पाटील माईंगडे यांनी वनविभागाला सकाळी साडेदहा वाजता दिली. रत्नागिरी परिक्षेत्र वनअधिकारी प्रियांका लगड तत्काळ आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाल्या. बिबट्या विहिरीत पडला होता. विहीर सुमारे 35 ते 40 फूट खोल आहे. या बिबट्याला पिंजर्‍यात घेण्यासाठी पिंजरा विहिरीत सोडला. एक तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी बिबट्याची तपासणी केली.

हे पण वाचा - कोल्हापूर जिल्ह्यात धुव्वाधार सुरुच ; शनिवारपर्यंत राहणार पावसाचे संकट

बिबट्या तंदुरूस्त असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वरिष्ठ वनअधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियांका लगड, वनपाल कांबळे, संगमेश्‍वर वनपाल सु. आ. उपरे, एम. जी. पाटील, आकाश कडुकर, सूरज तेली, स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आदींच्या मदतीने बिबट्याची सुटका करण्यात आली. 

अंदाजे तीन महिन्याची मादी बिबट्या 

1.10 मीटर लांब 
 0.40 मीटर उंची  
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After three hours of tireless efforts leopard fell into the well