Ratnagiri News : सावर्डे खोतवाढीसाठी ८४ कोटींचे धरण; २१३ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार

जलसंधारण विभागाकडून प्रस्ताव ; सावर्डे येथील धरण २५ हेक्टरमध्ये होणार असून, सर्वेक्षण पूर्ण
84 crores dam for Sawarde 213 hectares of land irrigation Water Conservation Department ratnagiri
84 crores dam for Sawarde 213 hectares of land irrigation Water Conservation Department ratnagirisakal

- संदीप घाग

सावर्डे : जलसंधारण विभागाकडून सावर्डे येथे ३४०० दलघन मीटर साठवण क्षमतेचे धरण उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २५ हेक्टर जागा संपादित करावी लागणार असून, या धरणाच्या माध्यमातून २१३ हेक्टर जमीन ओलिताखाली येईल.

तसेच सावर्डे व कोंडमळा येथील ग्रामस्थांचा पाणीप्रश्नही निकालात निघणार आहे. भूसंपादनासह या धरणाचे अंदाजपत्रक सुमारे ८४ कोटी असून, हा प्रस्ताव विभागीय कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. याला जलसंधारण विभागानेही दुजोरा दिला आहे.

सावर्डे येथील धरण २५ हेक्टरमध्ये होणार असून, सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सावर्डे येथे धरणाची ग्रामस्थांची मागणी होती. आमदार शेखर निकम यांनी जलसंधारण विभागाला प्रस्ताव करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ही कार्यवाही सुरू होती.

84 crores dam for Sawarde 213 hectares of land irrigation Water Conservation Department ratnagiri
Ratnagiri Waterfalls : पर्यटकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! धबधब्यांबाबत पोलिस दलानं केलं 'हे' आवाहन

मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या सावर्डे गाव शहराप्रमाणे विकसित होत आहे. या ठिकाणी गेल्या काही वर्षांत सह्याद्री शिक्षणसंस्था, डेरवण रुग्णालय, मेडिकल कॉलेज, सह्याद्री व्यवसाय अभिमुख महाविद्यालय इमारत विकासक, आठवडा बाजार, हॉटेल व्यावसायिक वाढले आहेत.

भविष्याचा विचार करता धरण प्रकल्प झाला तर लागणारी पाण्याची गरज पुरवणे शक्य आहे. त्यासाठी आमदार निकम यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने धरण प्रकल्प प्रस्तावित केला आहे. १९७५च्या दशकात सावर्डे येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती.

स्व. गोविंदराव निकम यांनी खासदार झाल्यानंतर इंडो-जर्मन प्रकल्पाच्या धर्तीवर नळपाणी योजना मंजूर करून आणली. त्यानंतर राष्टीय पेयजल, जलस्वराज्य, सध्याची १७ कोटींची जलजीवन योजनेतील कामे सुरू आहेत. भविष्यात नव्याने होणाऱ्या धरणामुळे सावर्डे व कोंडमळा गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.

दृष्टिक्षेपात

  • सावर्डे-कोंडमळ्याचा पाणीप्रश्न निकाली लागणार

  • भूसंपादनासह अंदाजपत्रक तयार

  • सावर्डे येथील धरण भैरीचखोरेत होणार

  • खोतवडी चव्हाण ग्रामस्थांनी दिली जागा

84 crores dam for Sawarde 213 hectares of land irrigation Water Conservation Department ratnagiri
Ratnagiri : CM शिंदेंचा टेम्पो कधीही कलंडणार; खासदार राऊतांनी केलं शिंदे गटाचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य

सावर्डे येथे धरण बांधणे भविष्यासाठी गरजेचे असून, त्यासाठी आमदार शेखर निकम हे खूप वर्ष प्रयत्न करत आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध होत नव्हता. अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यामुळे सावर्डे येथील धरण प्रकल्प मार्गी लागला आहे.

- विजय गुजर, माजी जिल्हा परिषद सदस्य

सावर्डे हे शहरीकरणाकडे झेप घेत असून, धरण ही काळाची गरज आहे. याबाबत आमदार शेखर निकम वारंवार पाठपुरावा करत असून, या धरणासाठी ग्रामस्थांनी ही जागा उपलब्ध करून दिली आहे.

- सूर्यकांत चव्हाण, माजी सरपंच

सावर्डे खोतवाडी योजनेचे मुख्य धरण व तत्सम कामे करण्याचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेकरिता सादर केले आहे. या योजनेला आवश्यक त्या सर्व मंजुरी प्राप्त झाल्यानंतर धरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

- सागर भराडे, उपविभागीय अभियंता

84 crores dam for Sawarde 213 hectares of land irrigation Water Conservation Department ratnagiri
Ratnagiri Politics : ठाकरे सेनेचा 'हा' निष्ठावंत शिलेदार रत्नागिरीतून रिंगणात? भास्कर जाधवांना लोकसभेची ऑफर

पडीक जमीन ओलिताखाली आणत असतानाच उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी छोटी-छोटी धरणे आवश्यक आहे. सावर्डेसह रिक्टोली आणि संगमेश्‍वर तालुक्यातील कळंबुशी येथे धरण बांधण्याचे प्रस्ताव जलसंधारण विभागाकडून तयार करण्यात आले आहेत. प्रस्ताव गेल्यानंतर सातत्याने आमदार शेखर निकम यांच्याकडून शासनस्तरावर पाठपुरावा सुरू होता.

सत्तांतरामुळे त्याला अपेक्षित यश आले नाही. आता अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळे धरणांचे प्रस्ताव मार्गी लागतील, असा विश्‍वास आमदार निकम यांच्याकडूनही व्यक्त केला जात आहे. जलसंधारण विभागाकडून प्रस्तावित केलेल्या धरणांचा आढावा घेणारी ही मालिका आजपासून...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com