
रत्नागिरी : कोकण रेल्वेचे ८७ टक्के विद्युतीकरण
रत्नागिरी : कोकण रेल्वे आता लवकर विजेवर धावणार असून, रोहा ते वेरणा या मार्गावरील विद्युतीकरणाचे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. यासाठी सुमारे १ हजार १०० कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेचे २०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. तर पर्यावरणपूरक इंधनाच्या वापरामुळे प्रदूषण कमी होईल. सध्या पहिल्या टप्प्यात दिवा ते रत्नागिरी मार्गावर पहिली पॅसेंजर धावू लागली आहे.
हेही वाचा: कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा MIDC रस्त्यांवरुन मनसेकडून शिवसेना ट्रोल
भारतीय रेल्वे मार्गावरील अनेक ठिकाणी विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. देशातील सर्वात मोठे रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम कोकण रेल्वे मार्गावर केले जात आहे. मागील वर्षी रोहा ते रत्नागिरी रेल्वे स्थानकापर्यंत विद्युतीकरण पूर्ण झाले. पुढे कारवार ते ठोकूर येथील विद्युतीकरणाची काम अंतिम टप्प्यात आहे. रत्नागिरी ते कारवार या विभागातील काम युद्धपातळीवर चालू असून पहिली चाचणीही झाली आहे. या मार्गावरील बोगद्यामधील विद्युत यंत्रणा टाकण्याचे काम चालू आहे. ही कामे मार्चपर्यंत पूर्ण होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेची वार्षिक २०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. सध्या डिझेलवर रेल्वेचा ३०० कोटी रुपयांचा खर्च दरवर्षी होतो. विजेवर गाड्या सोडण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च लागू शकतो. आणखी एक फायदा म्हणजे विद्युतीकरणामुळे प्रदूषण टळणार आहे.
हेही वाचा: पुण्यात तयार होणार Sputnik-V; सीरमला DCGIची परवानगी
कोकण रेल्वेचा मार्ग जंगलातून गेला आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांमुळे विद्युत प्रवाह खंडित (वायर ट्रिपिंग) होण्याचे प्रकार होऊ शकतात. पुरवठा खंडित झाला की गाडी १०० मीटरमध्ये जाऊन थांबते. अशी ठिकाणे निश्चित करून तेथे आपत्कालीन यंत्रणा ठेवली जाणार आहे. तर, दुसऱ्या बाजूला एखादे इंजिन निकामी झाले. तर, पिगबॅक करायला बॅकअप डिझेल इंजिन तयार ठेवणे आवश्यक असल्याने यावर कोकण रेल्वे प्रशासनाकडून कामे सुरू आहेत.
प्रवास होणार वेगवान
कोकण रेल्वेच्या दुहेरी मार्गाचे कामही युद्धपातळीवर होत आहे. रोहा पासून पुढे काही ठिकाणी दुहेरी मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. काही रेल्वे स्थानकादरम्यानही दुहेरी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास वेगवान होणार आहे.
दृष्टिक्षेपात...
२०१६ मध्ये विद्युतीकरणाला मंजुरी
४४३ कि.मी.चे विद्युतीकरण पूर्ण
रोहा ते रत्नागिरी २०४ कि.मी. पूर्ण
कारवार ते ठोकूर २३९ कि.मी. पूर्ण
एकूण १ हजार १०० कोटी खर्च अपेक्षित
Web Title: 87 Percent Electrification Of Konkan Railway
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..