esakal | सिंधुदुर्गात कोरोनाचे 93 जण पॉझिटीव्ह; तर एकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

93 positive corona patient found in Sindhudurg

जिल्ह्यात आतापर्यंत 7 हजार 754 कोरोना रुग्ण मिळाले आहेत. यातील 6 हजार 712 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज आणखी एका रुग्णाचे निधन झाल्याने एकूण कोरोना मृत संख्या 193 झाली आहे.

सिंधुदुर्गात कोरोनाचे 93 जण पॉझिटीव्ह; तर एकाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - कोरोनाने जिल्ह्यात आणखी एका रुग्णाचे निधन झाले आहे. जिल्ह्यात आज नवीन 93 व्यक्तीचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. 41 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या 843 रुग्ण उपचार घेत आहेत. 

जिल्ह्यात आतापर्यंत 7 हजार 754 कोरोना रुग्ण मिळाले आहेत. यातील 6 हजार 712 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज आणखी एका रुग्णाचे निधन झाल्याने एकूण कोरोना मृत संख्या 193 झाली आहे. परिणामी जिल्ह्यात 843 रुग्ण उपचाराखाली राहिले आहेत. यातील जिल्ह्याबाहेर जावून उपचार घेत असलेले रुग्ण वगळता सर्व रुग्णावर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल अथवा होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून देण्यात आली. 

843 रूग्ण सक्रिय असून त्यापैकी 11 रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. यातील सहा रुग्ण ऑक्‍सीजनवर तर पाच रुग्ण व्हेन्टीलेटरवर उपचार घेत आहे. आर.टी.पी.सी.आर टेस्ट मध्ये 46 हजार 367 नमुने तपासण्यात आले. यातील 5 हजार 391 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 842 नमूने घेण्यात आले.ऍन्टिजन टेस्टमध्ये एकूण 31 हजार 417 नमुने तपासले. पैकी 2 हजार 586 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन 111 नमूने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण 77 हजार 584 नमूने तपासण्यात आले. 

तालुकानिहाय पॉझिटीव्ह रुग्ण व कंसात मृत्यू झालेले असे ः देवगड 681 (15), दोडामार्ग 395 (5), कणकवली 2257 (50), कुडाळ 1680 (36), मालवण 765 (20), सावंतवाडी 1022 (44), वैभववाडी 269 (12), वेंगुर्ले 643 (10) जिल्ह्याबाहेरील रुग्ण 42 (1). तालुकानिहाय सक्रीय रुग्ण ः देवगड - 165, दोडामार्ग - 22, कणकवली - 152, कुडाळ - 155, मालवण - 114, सावंतवाडी - 99, वैभववाडी - 57, वेंगुर्ले- 69 व जिल्ह्याबहेरिल 10 अशाप्रकारे रुग्ण आहेत. 

कुंभारमाठ येथील एकाचे निधन 
31 मार्चला जिल्ह्यात 183 कोरोना मृत्यु होते. आता ही संख्या 193 झाली आहे. गेल्या आठ दिवसांत 10 रुग्णाचे कोरोनामुळे मृत्यु झाले आहेत. यात आज मालवण तालुक्‍यातील कुंभारमाठ येथील मृत्यु झालेल्या 64 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यांना यकृत विकार होता. 
 

loading image