
Homemade Faral Goes Online with Free Home Delivery in Pali.
Sakal
पाली : दिवाळीत कामाची लगबग, वेळेचा अभाव आणि इतर कारणांमुळे अनेकांना घरी फराळ बनवणे शक्य होत नाही. अशा वेळी रेडिमेड फराळाला पसंती असते. परिणामी दिवाळीत घरगुती फराळ विक्री सुरु झाली आहे. मात्र हा घरगुती फराळ घरबसल्या मागवून घरपोच मोफत मिळाला तर दुधात साखरच ! ऑनलाईन तसेच फेसबुक व व्हाॅट्सअपद्वारे घरपोच घरगुती दिवाळी फराळ विक्रीस व आगाऊ बुकींगची सुरुवात झाली आहे. त्यामूळे नोकरदार महिलांसह अनेकांची दिवाळी अगदी सुकर होणार आहे.