esakal | आली गौराई अंगणी...देवरुखात गौराईचे उत्साहात आगमन
sakal

बोलून बातमी शोधा

gauri

आली गौराई अंगणी...देवरुखात गौराईचे उत्साहात आगमन

sakal_logo
By
प्रमोद हर्डीकर

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यात गणेशोत्सवाची धुम सुरु असुन गणेश आगमनानंतर दोन दिवसांनी म्हणजेच रविवारी गोराईचे घरोघरी आगमन झाले आहे. देवरुख परिसरात गौरी आणण्यासाठी सुवासिनींची लगबग दिसुन आली. गौराईचे आगमन झाले असुन पुजन होउन तीला एक दिवस गोडा व एक दिवस तिखटाचा नैवेद्य दाखवला जाणार आहे.

हेही वाचा: यंदाही 'गौरा'ई म्हणून पुजल्या जाणाऱ्या वनस्पतीचा तुटवडा

गणपती पाठोपाठ गौराईचे आगमन होते. काही ठिकाणी ती मुखवटे स्वरुपात सजते तर काही ठिकाणी पाच, सात, अकरा खड्याच्या स्वरुपात पुजली जाते. सुवासिनीं मैञिंणीसह नदीकाठी, ओढ्याकाठी एकञ जमतात व तेथुन विधिवत गौरी घरात घेवुन येतात. घरी औक्षण करुन घरात आल्यावर गौरीला संपुर्ण घर दाखवले जाते व गणेशाच्या शेजारी तीची विधिवत प्राण प्रतिष्ठापना केली जाते. हा सोहळा सुवासिंनीसाठी यादगार सोहळा असतो.

खास गौरी-गणपतीसणासाठी सुवासिनी माहेरी आलेल्या असतात. गौरी आणताना पारंपरिक गीते गायली जातात. नदीकाठी झिम्मा-फुगडीचा फेरही रंगत असतो. सुवासिनी हौसा पुजन करतात. दोन दिवस गणपतीबरोबरच गौरी पुजनात सुवासिनी दंग होउन जातात. या निमित्ताने अंगणात मनोहारी रांगोळ्याही रेखाटल्या जातात.

गौरी घरी आणताना घरात पावले रेखाटली जातात. गौरी आणताना बच्चेकंपनीही झांज वाजवणे, घंटा वाजवणे अशी कामे आनंदून करतात. कोकणात गणपतीबरोबरच गौरीचा सण तेव्हढाच उत्साहात साजरा केला जातो. १४ तारखेला गणपती बरोबरच या जेष्ठागौरीचे विसर्जन होणार आहे.

loading image
go to top