esakal | यंदाही 'गौरा'ई म्हणून पुजल्या जाणाऱ्या वनस्पतीचा तुटवडा
sakal

बोलून बातमी शोधा

gauri

यंदाही 'गौरा'ई म्हणून पुजल्या जाणाऱ्या वनस्पतीचा तुटवडा

sakal_logo
By
राजू पाटील : सकाळ वृत्तसेवा

राशिवडे बुद्रुक: गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा गौरी आगमनाच्या दिवशी गौरी म्हणून पुजल्या जाणाऱ्या या वनस्पतींचा तुटवडा भासला. डोंगरदऱ्यांमध्ये यंदा ही वनस्पती अत्यंत तुरळक असल्याचे दिसून आले. प्रारंभीपासून धुवाधार पाऊस ही यामागचे कारण असल्याचे बोलले जाते. यंदा गौराई नाही त्यामुळे पुढील वर्षी तिचे बीज नसणार परिणामी पुढेही तुटवडा भासण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: कोल्हापूर - गुडाळवाडीजवळ दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

आज गौराईचे घराघरात उत्साहात स्वागत झाले. गौराई म्हणजे डोंगरातील तेरडा जातीच्या कुळातील ही वनस्पती. 'लाल दांडे' हिरवी पाने आणि गुलाबी आकर्षक फुले. तिचे डहाळे मोडून पारंपारिक गीते म्हणत तिला देवीचा मान देऊन घरात आणले जाते. गावागावातील युवतींचे जथ्थे डोंगरावर जाऊन या वनस्पतीची छोटीशी मोळी बांधून नदीवर घेऊन जायचे आणि न्हाऊ (आंघोळ) घालून पारंपारीक गौरी गीते म्हणत घरी यायचे. दारात तिचे औक्षण करून मुठकापाणी करून स्वागत केले जाते. तीची पार्वती रूपात पूजा बांधून मोहरवाशीन समजून सगळं केलं जातं.

हेही वाचा: चंद्रकांत पाटील अफवा पसरवतात, त्या वक्तव्याचा राऊतांनी घेतला समाचार

डोंगर कपारीतील गवती कुरणांमध्ये ही वनस्पती मोठ्या प्रमाणात उगवत असते. अनेकदा त्याचे प्रमाण इतके विपुल असते की त्या परिसरात गवती वैरण मिळणे मुश्किल ठरते. यंदा मात्र गौराई शोधावी लागली आहे. एखाद दुसराच डहाळा घेऊन तिचे पूजन करून समाधान मानावे लागले आहे. यंदाचा जीवघेणा पाऊस आणि त्याची धुवाधार बरस यामुळे ही नाजूक वनस्पती कुजली असल्याची शक्यता ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.

मृगा मध्येच उगवणारी ही वनस्पती गणेशोत्सवा पर्यंत चांगल्या बीज-फळा पर्यंत आलेली असते. यंदा तिचा तुटवडा जाणवू लागल्याने पुढील वर्षी बीज पडणार नाही आणि गौराई उगवणार नाही याचीही चिंता लागून राहिली आहे.

"यंदा गौराईचे डहाळे मिळाले नाहीत म्हणून सोशल मीडियावरून अनेक निसर्ग प्रेमीनी जागृती सुरू केली आहे. मिळालेल्या गौराईच्या डहाळ्याचे बी काढून घ्या आणि आपल्या डोंगरावर पसरा नाहीतर गौराई नष्ट होईल. अशी जागृतीही सुरू आहे."

loading image
go to top