जिल्हा परिषदतेतील रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच शासनस्तरावर मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 November 2020

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या रिक्‍त पदांची संख्या जास्त असल्याने कामे करण्यास मर्यादा येत असल्याने रिक्‍त पदे भरण्यासाठी शासनस्तरावर मंजुरी मिळेल

दाभोळ : जिल्हा परिषद हा विकासाचा केंद्रबिंदू आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या रिक्‍त पदांची संख्या जास्त असल्याने कामे करण्यास मर्यादा येत असल्याने रिक्‍त पदे भरण्यासाठी शासनस्तरावर मंजुरी मिळेल, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा -  कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव-मुंबई फेस्टिवल स्पेशलला  मुदतवाढ -

दापोलीचे आमदार योगेश कदम व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने यांनी या रिक्‍त पदांसंदर्भात ग्रामविकास राज्यमंत्री यांचे लक्ष वेधले होते. कदम यांनी घर बांधणीच्या परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतींना द्यावेत, अशी मागणी केली होती. अब्दुल सत्तार म्हणाले, ग्रामीण भागातील घर बांधणीसाठी परवानगी देण्याचे अधिकार हे पंचायत समिती स्तरावर देण्यासंदर्भात आपण विचार करत आहोत.

दापोली तहसील कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयातील यूपीएस गेली दोन वर्षे नादुरुस्त असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यावर विविध कामांसाठी या कार्यालयात आलेल्या पक्षकारांना तासन्‌तास बसून राहावे लागते. त्यामुळे कार्यालयाला नवीन यूपीएस दिला जाईल, तसेच पक्षकारांना सुविधा उपलब्ध करू, शासनाकडून मिळणारी मदत ही हेक्‍टरी आहे. ज्यांच्याकडे गुंठ्यामध्ये जमिनी आहेत, त्यांना अतिशय कमी मदत मिळते. त्यामुळे कोकणसाठी गुंठ्यावर मदतीसाठी शासनस्तरावर प्रयत्न करू.

हेही वाचा - गोवळ जमीन घोटाळा प्रकरणी राजापूर दुय्यम निबंधकांच्या चौकशीचे आदेश -

निराधार लाभार्थ्यांना दिलासा

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना तीन महिन्यांपासून पेन्शन मिळाली नाही, असे पत्रकारांनी लक्षात आणून दिल्यावर या योजनेसह इतर योजनांमधील लाभार्थ्यांसाठी सुमारे ८ हजार २०० कोटी रुपये मंजूर केले असून, पाच दिवसांत या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, याची ग्वाही अब्दुल सत्तार यांनी दिली. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abdul sattar on konkan tour said jilha parishad empty seats fastly approved in ratnagiri