'रिफायनरीबाबत धाडसी मत मांडणारी नेतृत्व सेनेकडे नाहीत'

या रणरागिनींवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाल्यास भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी
'रिफायनरीबाबत धाडसी मत मांडणारी नेतृत्व सेनेकडे नाहीत'

राजापूर : “रिफायनरी प्रकल्पासंबंधित (nanar refinery) जनतेचे हित प्रांजळपणे स्विकारण्याचे आणि ते जनतेचे मत मांडण्याचे धैर्य त्या दोन्ही नगरसेविकांनी दाखविले. मात्र, तसे धैर्य शिवसेनेचे (shivsena) आमदार राजन साळवी, (rajan salavi) खासदार विनायक राऊत (vinayak raut) आणि सेना नेतृत्वाकडे नाही. ” अशी टिका भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव यांनी केली आहे. यावेळी त्यांनी प्रकल्प समर्थनाची भूमिका घेतल्याबद्दल सेनेच्या नगरसेविका प्रतिक्षा खडपे आणि मनिषा मराठे यांचे विशेष कौतुक करताना या रणरागिनींवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाल्यास भारतीय जनता पार्टी (BJP) त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असेही स्पष्ट केले.

रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारा ठराव काल झालेल्या नगर पालिकेच्या सभेमध्ये मंजूर झाला आहे. यामध्ये शिवसेनेच्या अन्य नगरसेवकांनी ठरावाच्या विरोधी मतदान केलेले असताना मात्र, प्रतिक्षा खडपे आणि मनिषा मराठे यांनी प्रकल्प समर्थनाच्या ठरावाच्या बाजूने मत मांडले. त्याचे शिवसेनेमध्ये पडसाद उमटताना प्रतिक्षा खडपे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. या सार्‍या घडामोडींवर गुरव यांनी भाष्य केले आहे.  

'रिफायनरीबाबत धाडसी मत मांडणारी नेतृत्व सेनेकडे नाहीत'
'नाणार रिफायनरी होणार नाही; शिवसेना स्थानिकांसोबत कायम'

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, “सेनेच्या त्या दोन नगरसेविकांनी रिफायनरीबाबतचे जनतेचे प्रांजळ मत स्पष्टपणे स्विकारले आहे. त्यामुळे चवताळलेल्या कुचकामी नेत्यांनी त्यांच्यावर पक्ष कारवाई करण्याची अथवा करणार आहोत असे म्हणण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेवटी अशा कुचकामी नेतृत्वाकडून आणखी काय अपेक्षा करणार ? जनतेच्या हिताच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकणार्‍या व विकासात्मक दृष्टीकोन ठेवणार्‍या सर्व व्यक्तींचे भाजपामध्ये सदैव स्वागतच असेल. ” वरकरणी रिफानरी प्रकल्प विरोध दाखवणार्‍या कुचकामी व विकासशून्य शिवसेना नेत्यांनी आता स्थानिक कार्यकर्ते आणि जनतेला रिफायनरी प्रकल्प हवा की नको हे जाणून घेणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com