दुर्देवी! घरी पोहचण्यापुर्वीच दाम्पत्यावर काळाचा घाला

accident husband wife death dabholi sindhudurg district
accident husband wife death dabholi sindhudurg district
Updated on

कुडाळ (सिंधुदुर्ग) - वेताळबांबर्डे येथे कंटेनर व मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दाभोली (ता.वेंगुर्ले) येथील पती-पत्नी जागीच ठार झाले. मुकुंद आसोलकर व तेजश्री पारकर-आसोलकर अशी त्यांची नावे आहेत. पारकर दाम्पत्य दाभोली येथील घरी जात असताना वाटेत त्यांना काळाने गाठल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची घटना काल रात्री उशिरा घडली. 

याबाबत माहिती अशी की, मुकुंद आसोलकर हे पिंगुळी काळेपाणी येथे स्नेहा फार्म येथे कामाला होते. पत्नी तेजश्री या ओरोस जिल्हा रुग्णालयात परिचारिका म्हणून सेवा बजावत होत्या. कोरोना संकट कालावधीत बसेस नसल्याने मुकुंद पत्नीला आणण्यासाठी दुचाकीने गेले होते. काल (ता.1) रात्री पत्नीला घेऊन येत असताना कंटेनरची धडक बसून अपघात झाला. यात पतीसह पत्नी जागीच ठार झाली. घटनास्थळावर मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे दोघांचीही ओळख पटली. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. 

प्रशासन हळहळले 
याबाबतची माहिती जिल्हा रुग्णालयात मिळाल्यानंतर प्रशासनाने हळहळ व्यक्त केली. एकीकडे कोरोनाचे संकट, जिल्ह्यातील एका परिचारीकेला झालेली कोरोनाची लागण आणि आता एका परिचारीकेचा अपघाती मृत्यूमुळे सारेच गहिवरले. पारकर दाम्पत्यांना दीड वर्षांचा मुलगा आहे. या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कंटेनर चालक पसार झाला असून वाहकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांनी भेट देऊन पाहणी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com