
लांजा (रत्नागिरी) : रविवारी सायंकाळी होणाऱ्या स्वत:च्या साखरपुड्याचे सामान खरेदी करून लांजाहून घरी परतणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणाचा तिहेरी अपघातात जागीच मृत्यू झाला. आधी दुचाकी कारला आणि नंतर ट्रकवर आदळला. ही टक्कर एवढी जोरदार होती की, दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. मुंबई-गोवा महामार्गावर लांजा कुंभारवाडी येथे हा अपघात घडला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव अक्षय केशव सोलीम असे आहे.
याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील ओशी येथील अक्षय केशव सोलिम (वय 22 वर्षे) या तरुणाचा रविवारी सायंकाळी साखरपुडा होता. या निमित्ताने साखरपुड्याचे सामान खरेदी करण्यासाठी तो मित्रासह लांजा बाजारपेठेत आला होता. तेथे सकाळी साखरपुड्याचे सामान खरेदी करून तो आपल्या स्कूटरने (डीओ स्कूटर एमएच 08- डब्ल्यू 94 66) घरी परतत असताना दुपारी 12.15 दरम्याने लांजा कुंभारवाडी येथे समोरील कारला (क्र. एमएच 01- डिके 8357) ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने प्रथम कारला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर तो कारच्या ड्रायव्हरच्या साईडला जाऊन धडकला. याच दरम्यान समोरून लांजाच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवर (क्र. एमएच 09- 5529) आपटला; त्यानंतर अक्षय ट्रकच्या पाठीमागील चाकात घुसला. यात तो जागीच ठार झाला. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत जाधव हे करीत आहेत.
नीलेश घाणेकर सुदैवाने बचावला
भीषण अपघातात अक्षयचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या पाठीमागे बसलेल्या नीलेश वासुदेव घाणेकर हा सुदैवाने बचावला. तो किरकोळ जखमी झाला. हा ट्रक संतोष सत्यवान रसाळ चालत होता. बेदरकारपणे स्कूटर चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी दुचाकीस्वार अक्षय सोलिम याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.