
चिपळूण (रत्नागिरी) : कबड्डीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील दसपटीच्या लाल मातीत तयार झालेला आणि सर्वत्र कबड्डीचे मैदान मारणाऱ्या कोळकेवाडीचा सुपुत्र शुभम शिंदे याची महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या कर्णधारपदी सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली आहे. येथील अजिंक्य अशोक पवार याचाही १५ जणांच्या राज्य संघात समावेश आहे.
कबड्डीचे मैदान गाजविणाऱ्या शुभम शिंदे याचे मूळ गाव कोळकेवाडी. सध्या त्यांचे कुटुंब खेर्डी, माळेवाडी येथे वास्तव्याला आहे. अलोरे हायस्कूल, डीबीजे महाविद्यालयात शिक्षण झाले. सध्या तो एफवायबीएचे शिक्षण घेत आहे. लहान वयातही शुभमने वैयक्तिक बक्षिसे मोठ्या प्रमाणात मिळवली आहेत. वडील शशिकांत शिंदे, प्रशिक्षक जगदीश शिंदे, अशोक शिंदे, राजेश कुंभार, प्रताप शिंदे, प्रितेश शिंदे, किरण शिंदे यांचे शुभमला वेळोवेळी मार्गदर्शन मिळते आहे.
२०१७ पासून सेंट्रल बॅंकेच्या संघातून त्याने व्यवसायिक कबड्डीत पदार्पण केले. दोन वर्षे एअर इंडियाच्या संघात होता. गेल्या वर्षभरापासून मुबई येथील फलटण संघातून नशिब आजमावतो आहे. वयाच्या २२ साव्या वर्षी तो महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाचा सलग दुसऱ्या वर्षी कर्णधार झाला आहे. या स्पर्धेची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.
शशिकांत शिंदेही कबड्डीपटू
शुभमचे वडील शशिकांत शिंदे हे देखील कबड्डीपटू. आर्मीचा संघ त्यांनी गाजवला होता. मुलानेही गावाचेच नाही तर कोकणचे नाव अभिमानाने उचवावे, यासाठी त्यांनी शुभमला लहानपणापासून कबड्डीचे धडे देण्यास सुरवात केली. त्यांच्या तालमीत शुभम कबड्डीचे धडे गिरवू लागला. कोळकेवाडीतील वाघजाई क्रीडा मंडळाने त्याला आकार दिला. गेल्या काही वर्षात वाघजाई संघाने जिल्ह्यातील कबड्डी स्पर्धांची मैदाने गाजवली आहेत.
निवड झालेला राज्यांचा संघ
शुभम शिंदे (कर्णधार), पंकज मोहिते (उपकर्णधार), विकास काळे, सिद्धार्थ देसाई, संकेत सावंत, गिरीश इरनाक, रिशांक देवाडिगा, अजिंक्य पवार, मयूर कदम, दादासाहेब आव्हाड, नीलेश साळुंखे, सुशांत साईल, सुनील दुबिले, ऋतुराज कोरवी, सुधाकर कदम.
"राज्य संघात अनेक अनुभवी व सिनिअर खेळाडू असूनही कर्णधार म्हणून निवड झाली, हे माझे भाग्यच समजतो. संघात अनेक दर्जेदार, अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे ६८ वी राष्ट्रीय अजिंक्यपद आम्ही मिळवू."
- शुभम शिंदे, कर्णधार, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.