महाडजवळ टेम्पो-दुचाकीचा भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी

सुनील पाटकर
Friday, 31 May 2019

-  मुंबई-गोवा महामार्गावर इसाने कांबळे गावच्या हद्दीत झाला हा अपघात.

महाड : मुंबई-गोवा महामार्गावर इसाने कांबळे गावच्या हद्दीत भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील त्याची दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. 

अर्जुन हरी रासकर (वय-50, रा. नवेनगर, महाड) हे सुटी संपवून आपल्या ज्योती ( वय 19 ) आणि श्रीधर (वय 8 ) या दोन मुलांना दुचाकीवरून  इंदापूर ( पुणे ) येथून महाडला परत येत होते. त्यांची पत्नी मागेच असलेल्या एस.टी. बसमधून प्रवास करत होती. इसाने कांबळे गावाच्या हद्दीत त्यांची दुचाकी आली असता समोरून आलेल्या टेंपोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात अर्जुन रासकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही मुले गंभीर जखमी झाली आहे. या दोन्ही मुलांना पुढील उपचारांसाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान, या अपघाताची नोंद महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident in Mahad One killed and two injured