एक तासापासून कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

रत्नागिरी- कोकण रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. रत्नागिरीतील भोके गावाजवळ विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणारे मशिन रेल्वे ट्रॅकवरून घसरले. यामुळे या मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणारे युएमव्ही मशिन रेल्वे रुळावरून घसरले आहे. यामुळे मुंबईकडून येणाऱ्या आणि मुंबईला जाणाऱ्या गाड्यांना ब्रेक लागला आहे. काही गाड्या रत्नागिरी तर काही चिपळूण स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. जवळपास एक तासापासून कोकण रेल्वेची वाहतुक ठप्प झाली आहे. 

मशिन रेल्वे ट्रॅकवर आणण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी क्रेन मागवण्यात आली आहे. लवकरच मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत होईल, असे कोकण रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident near Bhoke Ratnagiri Konkan Rail timetable colasp