चालत्या मोटारीत सीटबेल्ट लावणे पडले महागात 

भूषण आरोसकर
Saturday, 20 February 2021

ही धडक एवढी मोठी होती, की मोटारीतील एअर बॅग फुटली. एअर बॅगमुळे मोठा अनर्थ टळला

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - मोटारीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी रस्त्याकडेला असलेल्या कठड्यावर आदळून अपघात झाला. यात 4 प्रवासी जखमी झाले. हा अपघात आज न्यू-खासकीलवाडा परिसरात घडला. जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

याबाबत माहिती अशी, की येथे मोटार चालक असलेली महिला मोटार सुरू असतानाच बाजूला बसलेल्या महिलेचा सीट बेल्ट लावत होती. यावेळी चालक महिलेचा मोटारीवरील ताबा अचानक सुटला आणि मोटार थेट रस्त्याकडेला असलेल्या एका संरक्षक कठड्यावर जाऊन जोरात आदळली. ही धडक एवढी मोठी होती, की मोटारीतील एअर बॅग फुटली. एअर बॅगमुळे मोठा अनर्थ टळला; मात्र मोटारीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. मोटारीतील इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.  

संपादन - राहुल पाटील

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident sawantwadi konkan sindhudurg