Accident: रोहा-कोलाड मार्गावर एसटीची स्कूल बसला धडक अन्..

school girl died after being hit by sugarcane tractor accident police traffic marathi news
school girl died after being hit by sugarcane tractor accident police traffic marathi newssakal
Updated on

Roha: रोहा-कोलाड मार्गावर दाट धुक्यातून ओव्हरटेक करताना एसटी बसचालकाने स्कूल बसला मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी डॉ. धूर्व यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी (ता. २) पहाटे साडेसहाच्या सुमारास हा अपघात घडला.


नारायण सीताराम (रा. हनुमाननगर, रोहा) हे शनिवारी सकाळी आपल्या ताब्यातील स्कूल बसमधून शाळकरी मुलांना रोह्याकडून कोलाडकडे घेऊन जात होते. दरम्यान, त्यांच्या मागून येणाऱ्या रोहा-तुळजापूर एसटी बसचा चालक स्कूल बसला ओव्हरटेक करत होता.

school girl died after being hit by sugarcane tractor accident police traffic marathi news
Accidet News: खड्ड्याने घेतला आणखी एक बळी; दोन वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

मात्र पहाटे दाट धुके असल्याने एसटीची स्कूल बसला मागून जोरदार धडक बसली. त्यामुळे स्कूल बस रस्त्याखाली उतरून सुदर्शन बस स्टॉपच्या भिंतीवर आदळली. या अपघातानंतर शालेय विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढण्यात आले.

घटनेत काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. तसेच स्कूल बसचेही नुकसान झाले. रोहा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शिद अधिक तपास करीत आहेत.

school girl died after being hit by sugarcane tractor accident police traffic marathi news
Solapur Accident News : उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या धडकेने एका शाळकरी मुलीचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com