टेम्पो- दुचाकीच्या धडकेत एक ठार तर एक जखमी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 November 2020

हा अपघात रायपाटण येथे झाला. 

राजापूर (रत्नागिरी) : छोटा टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत स्वार जागीच ठार झाला. धोंडू सीताराम गांगण (वय 62) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. हा अपघात रायपाटण येथे झाला. 

हेही वाचा - दिवाळीचा बाजार अवघ्या 59 रुपयांत -

धोंडू सीताराम गांगण हे दुचाकीवरून (एमएच-08-एन-6299) एका सहकाऱ्यासह धामणपेकडून रायपाटण गांगणवाडीकडे दुपारी 12 च्या सुमारास येत होते. त्याचवेळी समोरून येणारा छोटा टेम्पो (एमएच-08-डब्लू-1880) रायपाटणकडून ओणीच्या दिशेने चालला होता. 

धोंडू गांगण यांनी गांगणवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे आपली दुचाकी वळविली असताना अचानक पुढून आलेल्या टेम्पोची त्यांना जोरदार धडक बसली. त्यामध्ये दुचाकी चालक धोंडू गांगण यांना जबरदस्त मार बसून त्यांच्या डोक्‍यालाही गंभीर दुखापत झाली. त्यांच्यासमवेत असलेल्या सहकाऱ्याला किरकोळ दुखापत झाली. 

अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील धोंडू गांगण यांना तत्काळ रायपाटण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचे निधन झाले होते. अपघातप्रकरणी रायपाटण पोलिस दूरक्षेत्राकडून जाबजबाब घेण्याचे काम सुरू होते. 

हेही वाचा -  आता प्रवासी बॅगांचा पॅटर्न बदलला ; चार हजार प्रकार ग्राहकांसाठी -


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident of tempo and two wheeler in rajapur area one person dead