
जखमी पर्यटक हे चिक्कोडी (कर्नाटक) येथील आहेत. सावंतवाडी येथे रात्री उशिरा जेवण करून ते वास्को-गोवा येथे विमानतळावर जात होते.
बांदा (सिंधुदुर्ग) - बेळगावहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या मोटार चालकाचा ताबा सुटल्याने इन्सुली डोबाशेळ येथे अपघात झाला. मोटार पलटी झाल्याने आतील दोघांना दुखापत झाली. हा अपघात काल (ता.22) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास झाला.
जखमी पर्यटक हे चिक्कोडी (कर्नाटक) येथील आहेत. सावंतवाडी येथे रात्री उशिरा जेवण करून ते वास्को-गोवा येथे विमानतळावर जात होते. सावंतवाडी-बांदा रस्त्यावर इन्सुली डोबाशेळ येथे चालकाचा ताबा सुटल्याने मोटार रस्त्याकडेला झाडाच्या खोडावर आपटून पलटी झाली. येथील उत्कर्ष युवक मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर, औदुंबर पालव यांनी तत्काळ धाव घेत मोटारीत अडकलेल्या दोघाही पर्यटकांना बाहेर काढले. त्यांना किरकोळ दुखापत झाली. अपघातात मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघाताची बांदा पोलिसात नोंद केली नाही.
संपादन - राहुल पाटील