

Accidental Gunshot Incident
esakal
Accidental Gunshot Incident Kokan : सहकाऱ्यासोबत शिकारीसाठी गेलेल्या वेर्ले येथील सचिन सुभाष मर्गज (वय २८) या तरुणाचा शिकारीच्या उद्देशाने झाडलेली गोळी लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ५) घडली होती. याप्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावंतवाडी पोलिसांनी सीप्रियन ॲन्थॉनी डान्टस (वय ३५, रा. कोलगाव) याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर केले असता ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.