esakal | फिल्मीस्टाईलने २३ लाख रूपये लुटून आरोपी झाले फरार
sakal

बोलून बातमी शोधा

crime

फिल्मीस्टाईलने २३ लाख रूपये लुटून आरोपी झाले फरार

sakal_logo
By
एकनाथ पवार

वैभववाडी : भरदिवसा दुचाकी अडवुन २३ लाख रूपये लुटण्याचा धक्कादायक प्रकार कोकिसरे घंगाळेवाडी येथे आज ता.१२ दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.रक्कम ताब्यात घेतल्यानंतर दुचाकीवरून आलेले तिघेही तळेरेच्या दिशेने पसार झाले.बँक ऑफ इंडियाच्या वैभववाडी एटीएम मध्ये ही रक्कम भरण्यासाठी कणकवलीहुन दोघेजण येत होते.या प्रकारामुळे वैभववाडीत खळबळ माजली असुन विभागीय पोलीस अधिकारी आणि गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक वैभववाडीत दाखल झाले आहे.

सेक्युअर व्हॅल्यु इडिया लिमिटेड कंपनीचे कर्मचारी विठ्ठल खरात आणि संदेश कारीवडेकर या दोघांनी कणकवलीतुन ३० लाख रूपये घेतले.त्यातील ७ लाख रूपये कणकवलीतील बँक ऑफ इंडियांच्या एटीएममध्ये भरणा केले.त्यानंतर उर्वरित २३ लाख रूपये घेवुन ते दोघे दुचाकीवरून कणकवलीहुन वैभववाडीकडे निघाले होते.दरम्यान कोकिसरे घंगाळेवाडी येथे असताना अचानक त्यांच्या मागुन एक दुचाकी येवुन त्यांच्यासमोर उभी राहीली.

त्या दुचाकीवर तिघेजण होते.त्यातील एकाने दुचाकीवर लाथ मारून दुचाकी मारली.आणि तिघांनाही कर्मचाऱ्यांच्या हातातील २३ लाख रूपये रक्कम ताब्यात घेवुन तळेरेच्या दिशेने पोबारा केला.डोळ्यात कसली तरी पावडर टाकल्याचे कर्मचाऱ्यांकडुन सांगीतले जात आहे.भरदिवसा झालेल्या लुटीने वैभववाडीत खळबळ माजली आहे

या प्रकारानंतर विभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर,स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे आणि त्यांचे पथक वैभववाडी पोलीस स्थानकात दाखल झाले आहे.या प्रकाराची चौकशी पोलीसांनी सुरू केली आहे.

loading image
go to top