"सरनाईक आणि वायकर यांचं भुयारी गटार कलाननगरकडेच"

Action by ED against MLA Pratap Sarnaik Strong support from MLA Nitesh Rane
Action by ED against MLA Pratap Sarnaik Strong support from MLA Nitesh Rane

सिंधुदुर्ग : ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरुद्ध  ईडीने केलेल्या कारवाईचे भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पूत्र आमदार नीतेश राणे यांनी जोरदार समर्थन केलं आहे. ठाण्याचे सरनाईक आणि मुंबईचे वायकर यांचं भुयारी गटार कलाननगरकडे जात असल्याचे सांगत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनाही या प्रकरणात ओढले.

सरनाईक आणि वायकर हे भुयारी गटार असून त्यामार्फत ईडीने खोलात जाऊन तपास केला,तर ते कलानगरला पोचतील,असा खळबळजनक दावा त्यांनी केला.सरनाईक हा एक मुखवटा असून त्यामागील मुख्य कलाकार हा कलानगरमध्ये (ठाकरेंचं मातोश्री निवासस्थान असलेलं मुंबईच्या वांद्रे पूर्व येथील ठिकाण)बसला आहे,अशी फटकेबाजी त्यांनी केली.तिथे सकाळी गेलात, तरी सारी रहस्य बाहेर येतील,असेही ते म्हणाले.

ईडी,सीबीआय या देशातील जबाबदार संस्था असून त्यांना काही चुकीचे वाटले असेल म्हणून ही कारवाई झाली असेल,अशी प्रतिक्रिया त्यांनी सरनाईक यांच्यावर ईडीने टाकलेल्या छाप्यासंदर्भात दिली. गैरप्रकार झाला असेल, तर कारवाई झालीच पाहिजे, असे सांगत त्यांनी या कारवाईचे समर्थनही केलं. या कारवाईचे फटाके कुठपर्यंत फुटतात, ते लवकर दिसेलच,असे ते म्हणाले.

नारायण राणे यांनी, मात्र या प्रकरणावर थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. सरनाईक काय साधूसंत नाहीत, असे तिखट वक्तव्य,मात्र त्यांनी केलं. ईडीची ही कारवाई योग्य की अयोग्य हे सांगा, मग प्रतिक्रिया देईन,असे ते म्हणाले आहेत.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com