पुणे, मुंबईत हापूस म्हणून कर्नाटकी आंबा विकणाऱ्यांवर होणार कारवाई

पुणे, मुंबईत हापूस म्हणून कर्नाटकी आंबा विकणाऱ्यांवर होणार कारवाई

रत्नागिरी : कर्नाटकी आंबा (Karnataka Mango)रत्नागिरी हापूस (Ratnagiri Hapus) म्हणून फसवून रत्नागिरीत विकणे, ही रत्नागिरीच्या मातीशी गद्दारी केल्यासारखे आहे. व्यापारी कितीही मोठा असला तरी तक्रार आल्यास त्याच्यावर कारवाई करू, असा इशारा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant)यांनी दिला.

Action of Karnataka Mango is sold as Hapus kokan marathi news

एका आंबा बागायतदाराने काल (ता. १०) कर्नाटक येथील आंबा रत्नागिरीत आणला जात असल्याचा प्रकार पुढे आणल्याचा दावा केला. कर्नाटकी आंबा कोणाकडे नेण्यात येणार आहेत, याची कागदपत्रही ताब्यात घेतलेली होती. कर्नाटकी आंबा आणि हापूस भेसळ करून विकला जात असल्याने हापूसच्या दरावर मोठा परिणाम होतो.

पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरातून हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची सर्रास विक्री सुरू आहे. रत्नागिरीमध्ये अशा प्रकारे कर्नाटकी आंबा आणला गेल्याचा आरोप झाल्यावर सामंत यानी वरील विधान केले. या प्रकरणानंतर रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघाकडून जीआय मानांकनांतर्गत कोणती कारवाई करता येते का, यासाठी चर्चा सुरू होती.

कोणत्या नावाने विकला जातो हे महत्वाचे

रत्नागिरीत आणलेल्या कर्नाटकी आंब्यावर प्रक्रिया करून तो कोणत्या नावाने विकला जातो यावर कारवाईचे स्वरूप ठरणार आहे. दोन वर्षांपूर्वी बंड्या साळवी यांनीदेखील एका कंपनीत कर्नाटकी आंबा आणून त्याचे कॅनिंग करून तो "पल्प' रत्नागिरी हापूसच्या नावे विकला जातो,असे म्हटले होते.

Action of Karnataka Mango is sold as Hapus kokan marathi news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com