esakal | चिपळूणात राडा : ऊर्जा मंत्र्यांच्या दौऱ्यावरून तू तू- मै मै
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूणात राडा : ऊर्जा मंत्र्यांच्या दौऱ्यावरून 
तू तू- मै मै

दोन दिवसांपूर्वी ऊर्जामंत्री नितीन राऊत हे चिपळूण दौऱ्यावर आले होते. मात्र, ते पत्रकार परिषद सोडून अचानक निघून गेले.

चिपळूणात राडा : ऊर्जा मंत्र्यांच्या दौऱ्यावरून तू तू- मै मै

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : पूरपरिस्थितीचा अंदाज व मदतीचे नियोजन करण्यासाठी काँग्रेस नेते हुसेन दलवाई (Hussein Dalwai) यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता. ३१ जुलै) शहरातील परांजपे हायस्कूल येथे बैठक झाली. या बैठकीत ऊर्जा मंत्र्यांच्या दौऱ्याची पूर्वकल्पना न दिल्याच्या रागातून काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रवक्त्यांना धारेवर धरले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न काहींनी केला. काँग्रेसच्या बैठकीतील या गोंधळाची चर्चा शहरभर आहे.( Activists-Chiplun-Congress-Fights-spokesperson-Confusion-in-the-Congress-meeting-akb84)

दोन दिवसांपूर्वी ऊर्जामंत्री नितीन राऊत हे चिपळूण दौऱ्यावर आले होते. मात्र, ते पत्रकार परिषद सोडून अचानक निघून गेले. हा प्रकार चर्चेत असतानाच आता या राडेबाजीमुळे चिपळूण काँग्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काँग्रेस नेते हुसेन दलवाई व आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी व शहर पदाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागासाठी पक्षाकडून मदतीची मागणी केली. त्यानुसार दलवाई यांनी पक्षाकडून पूरग्रस्तांसाठी मोठी मदत येणार आहे. मदत वाटपासाठी सज्ज राहा, असे आवाहन केले. नितीन राऊत यांच्या बैठकीवेळी एकाच गटाचे कार्यकर्ते दिसले होते. त्यामुळे या दौऱ्यावरून आगामी काळात धुसफूस होईल, असे काही कार्यकर्त्यांनी बैठकीनंतर खासगीत सांगितले होते.

हेही वाचा: कोल्हापूर विमानतळाचे नामकरण करा; संभाजीराजेंची मागणी

‘ही काँग्रेसची संस्कृती नाही’

बैठकीदरम्यान, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या चिपळूण दौऱ्याची पूर्वकल्पना न दिल्याने तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकाराला जिल्हा प्रवक्ते अशोक जाधव यांना जबाबदार धरल्याने वादंग निर्माण झाला. त्यातून जाधव यांच्या अंगावर काहींनी धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना दलवाई यांनी संबंधितांना खडे बोल सुनावले. काँग्रेसची ही संस्कृती नाही. त्यामुळे अशा गोष्टी पक्षात खपवून घेतल्या जाणार नाहीत, असेही सुनावले.

loading image
go to top