वैभव मांगले सध्या करतात तरी काय.... . वाचा.

Actors vaibhav mangle Rangotsav festival at home kokan marathi news
Actors vaibhav mangle Rangotsav festival at home kokan marathi news

साडवली (रत्नागिरी) : कोरोनाचे देशावर संकट आले आणि आमची रंगभुमी संपुर्ण लाॅक झाली.मालीकांचेही शुटींग थांबले यामुळे मी गावाकडे कासारकोळवणला यायचा निर्णय घेतला आणि १९ मार्चलाच मी कुटुंबासह गाव गाठले असे अभिनेते वैभव मांगले यांनी मत व्यक्त केले.सध्या मी गावातला निसर्ग कॅनव्हासवर रेखाटत आहे व ही कला जोपासत रंगोत्सव साजरा करत आहे असेही वैभव मांगले यांनी सांगितले.

कॅनव्हासवर रेखाटली अनेक चिञे
आम्ही अभिनेते आमचा सगळा नाट्यसिझन कोरोना संकटामुळे लाॅक झाला.सध्या माझी अलबत्या गलबत्या व ईब्लीस ही नाटके चांगली चालत होती.हा सगळा सिझन चांगला गेला असता.
सध्या आपण लाॅकडाऊनचा  काळ कासारकोळवण गावात व्यतीत करीत असुन केळीच्या बागा,कलींगडचा मळा ,नदीकिनारा या ठिकाणी जावून मी कॅनव्हासवर हा निसर्ग उतरवत असुन हा रंगोत्सव मला वेगळाच आनंद देत आहे.आता कॅनव्हास संपला असुन नदीतील वेगवेगळ्या आकाराच्या दगडांना रंगरुप देत आहे.

कला जोपासत रंगोत्सव साजरा

घरातला पाट,जुनी रोवळीही रंगवुन झाली आहे.अभिनयापेक्षा आता मी या रंगातच रंगुन गेलो आहे.बर्‍याच वर्षांनी गावात असे वातावरण मी अनुभवत आहे असे वैभव मांगले म्हणाले.माझी पत्नीही कंपनीचा जाॅब वर्क फाॅर्म होम या तत्वावर काम करीत आहे.तीही सासरी इतका काळ कधी राहीली नव्हती ती या निमित्ताने सासरचे प्रेम अनुभवत आहे.दोन मुले आजोळचा पाहुणचार घेण्यात रमली आहे.

हेही वाचा-कोकणात पार्सल ट्रेन घेऊन आली औषधाचा साठा .....
लाॅकडाऊनच्या काळात आपण शासनाचे सर्व नियम पाळुन गावातच रहात आहे.नागरीकांनी घराबाहेर न पडता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनही अभिनेते वैभव मांगले यांनी केले आहे.सुरक्षित अंतर पाळत गावातील लोकही येवुन भेटुन जात आहेत हे आपुलकीचे प्रेमही या काळात मी अनुभवत आहे असे वैभव मांगले यांनी सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com