esakal | रत्नागिरीची कन्या अभिनेत्री अक्षता भोळेची आंतरराष्ट्रीय भरारी
sakal

बोलून बातमी शोधा

the actress of ratnagiri akshata bhole select for prag international film festival

अक्षताने मालिकांमध्ये न अडकता कलेचा वारसा पुढे नेण्यासाठी नाट्यप्रशिक्षक होणे पसंत केले.

रत्नागिरीची कन्या अभिनेत्री अक्षता भोळेची आंतरराष्ट्रीय भरारी

sakal_logo
By
मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : रत्नागिरीची अक्षता भोळे अभिनेत्री "अ डे ऑफ' या चित्रपटाची निवड लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क चित्रपट महोत्सव आणि प्राग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी झाली. अक्षताने मालिकांमध्ये न अडकता कलेचा वारसा पुढे नेण्यासाठी नाट्यप्रशिक्षक होणे पसंत केले. नंतर या चित्रपटाद्वारे तिने प्रमुख भूमिकेतील बालकलाकाराला त्याच्या भूमिकेत वावरण्यासाठीच्या अनेक क्‍लृप्त्या सांगितल्या. तिच्या या यशाबद्द रत्नागिरीकरांकडून कौतुक होत आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांनो चाऱ्याची पौष्टिकता वाढवायची आहे ? मग वाचा ही बातमी

या चित्रपटासाठी अक्षता भोळे हिने सिंहाचा वाटा उचलला. प्रथम निर्मिती असलेल्या अथवा जागतिक पातळीवर प्राधान्य मिळण्यासाठी ग्लोबल महोत्सव आणि प्राग फेस्टिव्हल आयोजित केला जातो. या महोत्सवाचे केंद्र पाईनवूड यु. के. असून ऑनलाइन स्क्रिनिंग बर्लिन, मॅंचेस्टर, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, ऍमस्टरडॅम, पॅरिस, सिडने, मेलबोर्न, लंडन येथे होणार आहे. अक्षता रत्नागिरीत अनेक वर्षे नाट्य दिग्दर्शन, लेखक क्षेत्रात नाव कमावलेल्या जिज्ञासा थिएटर्सचे संस्थापक सुहास भोळे यांची कन्या. तिला घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळाले. 

परफॉर्मिंग आर्टस्‌ची मास्टर्स डिग्री घेतल्यानंतर तिने काही मालिका केल्या. पुण्यात आंतरराष्ट्रीय शाळेत नाट्यशास्त्र शिकवले. "अ डे ऑफ'चा प्रमुख बाल कलाकार सृजन देशपांडे याला भूमिका समजावून देणे, त्याची मानसिक, शारीरीक तयारी करून घेण्याचे काम अक्षताने केले. तिने या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. सिनेमॅटोग्राफर सौरभ राजेमहाडीक यानेही कमाल केली. यात प्रशांत कराड, किरण पाटील, आदित्य शर्मा, अश्‍विनी सिसोडिया, संदीप बालगुडे व जिगर सोलंकी यांच्या भूमिका आहेत. 

हेही वाचा -  नागरिकांनो घाबरू नका, संजय गांधी राष्ट्रीय उदयान पथक झाले रत्नागिरी दाखल
 
अक्षताने प्रोजेक्‍ट वेळेत वाचवला 

"अ डे ऑफ' ही नुसतीच एका लहान मुलाची कथा नसून वडिलांच्या मारेकऱ्याला शासन करणारा प्रवास आहे. समाजातील भ्रष्टाचार, पित्याला मिळालेल्या अयोग्य वर्तणुकीचा आणि प्रेमाच्या व्यथांचा सामना याचे चित्रण आहे. अक्षता भोळे हिचा विशेष आभारी आहे. कारण तिने वेळेत हा प्रोजेक्‍ट पूर्ण केला आणि एक महत्वपूर्ण भूमिकाही साकारल्याचे दिग्दर्शक आदित्य साने यांनी सांगितले. 
 

संपादन - स्नेहल कदम 

loading image