esakal | 'भगव्या बँडसह अयोध्येतून आणलेला नामफलकाचा तुकडा , लाखो कारसेवकांचे स्वप्न होईल पूर्ण'
sakal

बोलून बातमी शोधा

ad parulkar memories of ram temple

‘अयोध्या में कारसेवा करके आए है।’ हे गीतसुद्धा आजही कानात गुंजत आहे.

'भगव्या बँडसह अयोध्येतून आणलेला नामफलकाचा तुकडा , लाखो कारसेवकांचे स्वप्न होईल पूर्ण'

sakal_logo
By
मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : अयोध्येत रामलल्लाची मूर्ती स्थापन झाली, सैन्य आले. त्यानंतर अयोध्येतून कारसेवक बाहेर पडले. तेव्हा म्हटलेले ‘अयोध्या में कारसेवा करके आए है।’ हे गीतसुद्धा आज कानात गुंजत आहे. कारसेवेनंतर रत्नागिरीतील विठ्ठल मंदिर व अन्य ठिकाणी व्याख्याने दिली. आता राममंदिर उभारणी होत आहे आणि आमच्यासारख्या लाखो कारसेवकांचे स्वप्न पूर्ण होत असून, जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटत आहे. आता रामलल्लाच्या दर्शनाची हुरहूर लागली, असे अ‍ॅड. बाबा परुळेकर यांनी सांगितले.

हेही वाचा - मुसळधारेमुळे दाणादाण; ग्रामस्थांच्या सतर्कतेने वाचले मुक्या जनावरांचे प्राण...

अ‍ॅड. बाबा परुळेकर म्हणाले, आयुष्यात दोन चांगल्या संधी मिळाल्या. एक ‘आणीबाणी’च्या काळात तुरुंगवास आणि दुसरी कारसेवा. 27 नोव्हेंबर 1992 ला रत्नागिरीतून बंडोपंत आठवले, डॉ. शांताराम केतकर, श्रीमती प्रमिला वैद्य, अ‍ॅड. हेगिष्टे, प्रकाश सोहोनी, निवास पटवर्धन, प्रवीण जोशी, कै. सदूभाऊ जोशी हे कारसेवक अयोध्येला रवाना झालो आणि 9 डिसेंबरला रत्नागिरीत आलो. रत्नागिरीतून काही शिवसैनिक आमच्यासोबत येणार होते. पण त्यांचा दौरा रद्द झाला.
शरयू नदीच्या किनारी हजारो लोक आंघोळ करत, पूजाअर्चा करत असे दृश्य पाहायला मिळाले. 

अयोध्येत 1992 पूर्वीपासूनच मंदिर निर्माणासाठी खांब, आराखडा व अन्य कामे सुरू होती. विराट मंडपामध्ये आचार्य धर्मेंद्र, साध्वी ऋतंभरा यांच्यासमवेत अनेक नेत्यांची भाषणे होत होती. परत येताना रेल्वे थांबेल तिथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काहींनी पुष्पहार घालून, औक्षण करून स्वागत केले. ही उत्स्फूर्तता मनाला भावणारी होती, असेही परुळेकर म्हणाले.

हेही वाचा - भरपावसात उपोषण; अनेकांचा पाठिंबा! काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर... 

युपीची शिवसेना वेगळी

विवादित वास्तू पाडण्यात हिंदुत्ववादी संघटना होत्याच. त्यात उत्तर प्रदेशमधील शिवसेनेचे कार्यकर्ते होते. त्यांचा व महाराष्ट्रातील शिवसेनेशी काडीमात्र संबंध नाही. बाबरी मशिद पडल्यानंतर 7 डिसेंबरच्या पहाटे दीड वाजता महाराष्ट्रातून आलेले पहिले शिवसैनिक सुभाष देसाई व काही सहकारी होते. ते दुपारी विमानाने मुंबईतून निघाले; मात्र अन्य कोणी शिवसैनिक तेथे नव्हता, अशी माहितीही अ‍ॅड. परुळेकर यांनी दिली.

संपादन - स्नेहल कदम 

loading image