esakal | कोयना प्रकल्पातून अतिरिक्त वीज निर्मिती |Ratnagiri
sakal

बोलून बातमी शोधा

Koyna Dam

कोयना प्रकल्पातून अतिरिक्त वीज निर्मिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : देशात कोळशाची कमतरता असल्यामुळे देशातील औष्णिक वीज प्रकल्पातील वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कोयना प्रकल्पातून अतिरिक्त म्हणजे दिवसाला सुमारे पाचशे ते पंधराशे मेगावॉट वीज निर्मिती करण्यात येत आहे. पुढील काही दिवस ही अतिरिक्त वीज निर्मिती सुरू राहणार असल्याची माहिती पोफळी येथील ‘महाजनको’च्या अधिकाऱ्यांनी दिली.

कोयना प्रकल्पाच्या चार टप्यांतून एक हजार ९२० मेगावॉट वीज निर्मिती केली जाते. मागणीच्या काळात म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी कोयना प्रकल्पातून वीज निर्मिती केली जाते. मात्र, सध्या राज्यात विजेचा तुटवडा असल्यामुळे प्रकल्पाच्या चारही टप्यातून मागणीनुसार २४ तास वीज निर्मिती सुरू आहे. वीज निर्मितीसाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करून प्रकल्पातून अतिरिक्त वीज निर्मिती सुरू आहे. महाराष्ट्रात खासगी आणि सरकारी कंपन्यांमधून वीज निर्मिती झाल्यानंतर ती कळवा (जि. ठाणे) येथील ग्रीडमध्ये आणली जाते. तेथून ती पूर्ण राज्याला मागणीनुसार वीज पुरवली जाते.

राज्याची विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी कळवा येथील वीज नियंत्रण कक्षातून होणाऱ्या सुचनेनूसार कोयना प्रकल्पातून अतिरिक्त वीज निर्मिती केली जात आहे. प्रकल्पाच्या चारही टप्यातून मागणीनुसार वीज निर्मिती करण्याचे नियोजन केले जात आहे.

- संजय चोपडे, मुख्य अभियंता, महाजनको पोफळी

फॅक्ट फाईल...

  1. कोळशाच्या तुटवड्याचा फटका बसला महाराष्ट्रातील औष्णिक वीज प्रकल्पांना

  2. राज्यातील सहाही औष्णिक वीज निर्मिती केंद्रातले प्लॉंट कोळशाअभावी बंद

  3. विजेची तूट भरुन काढण्यासाठी कोयना आणि इतर १२ होयड्रो प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू

  4. अतिरिक्त वीज निर्मिती करून एकूण तुटवड्यापैकी ६० टक्के तूट भरून काढण्याचे काम सुरू

loading image
go to top