esakal | पंचनामे करून लवकरच पॅकेजची घोषणा - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

पंचनामे करून लवकरच पॅकेजची घोषणा - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

पंचनामे करून लवकरच पॅकेजची घोषणा - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

sakal_logo
By
स्नेहल कदम

चिपळूण : चिपळूणमध्ये झालेल्या ढगफुटीसदृश्य (heavy rain) पावसामुळे तेथील रहिवाशांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. वाशिष्ठी नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून पाणी ओसरल्यानंतर या भागाची (chiplun flood) पाहणी करण्यासाठी नेते मंडळींचे दौरे सुरु आहेत. राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, राज्यपाल सर्वांनी या भागातील परिस्थितीचा आढावा घेत पाहणी केली आहे. यामध्ये पूरग्रस्त लोकांना लवकरात लवकर मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. आज राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी चिपळूणच्या मदत दौऱ्यादरम्यान पूरपरिस्थितीची पाहणी केली.

हेही वाचा: 'मोबाईलवरील एक फोटो म्हणजे पंचनामा नव्हे'

यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी (uddhav thackeray) सांगितल्याप्रमाणे पूरग्रस्तांना लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाणार आहे. यासाठी लवकरच पॅकेजची घोषणा करणार आहे. चिपळूणच्या पूरस्थितीचा आढावा घेताना, प्रत्येक पूरग्रस्तांना हक्काने विचार मांडण्याचा अधिकार असल्याचेही म्हटंले आहे. जेव्हा पूराचे पाणी निघून जाते, तेव्हा त्या परिसरात आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. अशावेळी साथीच्या रोगांचा फैलाव होण्याची शक्यता असते, त्यावर योग्य ते उपाय करण्याची गरज आहे. सरकार सर्व पूरग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेणार असून एकही माणूस मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व उपाययोजना केल्या जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

loading image
go to top