आमदार राणेंच्या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

कणकवली - चिखलफेक आंदोलनांनतर जाग आलेल्या हायवे प्रशासनाने अखेर ठेकेदाराच्या माध्यमातून कणकवली शहरातील महामार्गाचे डांबरीकरण सुरू केले आहे. बुधवारी सायंकाळी चार वाजल्यापासून शहरात डांबरीकरण सुरू झाले. आमदार नीतेश राणेंच्या आंदोलनाचे हे यश असल्याची प्रतिक्रिया शहरवासीयांतून व्यक्‍त झाली. 

डांबरीकरण कामासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गेले दोन महिने खड्डेमय रस्त्यामुळे त्रस्त असलेल्या शहरवासीयांना आज सुखद धक्‍का बसला. शहरातील सर्वाधिक दुरवस्था झालेला एस.एम.हायस्कूल ते तेलीआळी डीपी रोड पर्यंतचा मार्ग चक्‍क पावसातच डांबरीकरण करण्यात आला. सायंकाळी चार नंतर महामार्ग डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. या दरम्यान पावसाच्या जोरदार सरी बसरल्या. मात्र डांबरीकरणाचे काम तेवढ्याच वेगाने सुरू ठेवण्यात आले होते. या डांबरीकरणासाठी पावसाळी डांबर वापरले जात असल्याने ते टिकावू असल्याची माहिती दिलीप बिल्डकॉनच्या अभियंत्याकडून देण्यात आली. 

आंदोलनाची पार्श्‍वभूमी 
शहरातील खड्डेमय महामार्गाची स्थिती सुधारत नसल्याने आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून 4 जुलै रोजी गडनदीपुलावर आंदोलन झाले होते. यात उपअभियंत्यांना चिखलाची अंघोळ घालण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर शहरातील राजकीय वातावरण बिघडले होते. महामार्ग ठेकेदाराच्या कामगारांनाही काही दिवस रात्रीच्या वेळी मारहाण होत होती; मात्र खड्डेमय रस्त्यांचे डांबरीकरण सुरू केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: administration wake up after MLA Nitesh Rane agitation