कोरोनानंतर शिक्षणासाठी आता हाच एकमेव पर्याय....

मोहन भिडे
गुरुवार, 30 एप्रिल 2020

विज्ञान तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीचा वापर करून शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड प्रमाणात क्रांती घडू शकते. पूर्वपार आपल्याकडे गुरु-शिष्य ही परंपरा चालू आहे. आता या संकल्पना मोडीत काढाव्या लागतील.

रत्नागिरी : सध्या कोरोनाविरुद्ध जगात युद्ध सुरू आहे व ते लवकर संपेल, असे वाटत नाही व युद्ध संपल्यावरदेखील सोशल डिस्टन्सिंग हा मुद्दा कायम राहणार आहे व तो सर्व क्षेत्रावर परिणाम करेल. याचा शैक्षणिक क्षेत्रावरदेखील व्यापक परिणाम होणार आहे. कोरोनानंतरच्या जगात टिकायचे असेल तर सोशल डिस्टन्सिंग सांभाळूनच शैक्षणिक क्षेत्राचा विकास करावा लागेल. यात आपल्याला काय करता येईल किंवा कशा प्रकारे बदल घडू शकतात, कोरोनानंतरचे शैक्षणिक क्षेत्र कसे असेल....

विज्ञान तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीचा वापर करून शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड प्रमाणात क्रांती घडू शकते. पूर्वपार आपल्याकडे गुरु-शिष्य ही परंपरा चालू आहे. आता या संकल्पना मोडीत काढाव्या लागतील. शाळा-कॉलेज, खासगी शैक्षणिक संस्था व कोचिंग क्‍लासेस, यातील गर्दी बघता सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणे शक्‍यच होणार नाही व पर्यायाने आपल्याला Virtual शिक्षण पद्धतीत जावेच लागेल. 

हेही वाचा- Ramzan Special  : उष्णतेची पर्वा न करता दिवसभर उपवास...

शिक्षकांनी Virtual Class Room आत्मसात करावी

आत्ताच सगळ्या खासगी शैक्षणिक संस्थांची ऑनलाइन क्‍लास चालवण्याची धडपड सुरू झाली आहे. आत्ताची मुले टेक्‍नोसॅव्ही आहेतच. बऱ्याच प्रवेशपरीक्षा ऑनलाइन झालेल्या आहेतच. आपल्याला सर्व शिक्षण ऑनलाइन करावे लागेल. पहिली ते दहावी सर्व विषय ऑनलाइन शिकवावे लागतील. सध्या शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड आहेतच शिवाय आयटी विषय शिकवला जातो. त्यामुळे पहिल्या टप्प्यात सर्व शिक्षकांना Virtual Class Room आत्मसात करावी लागेल. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे ट्रेनिंग घ्यावे लागेल.

व्हिडिओ तयार करणे, एडिट करणे हे शिकावे लागेल. आपले व्हिडिओ अधिकाधिक परिणामकारक कसे होतील. त्यात Animation चा वापर कसा करता येईल, याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. प्रॅक्‍टिकलसाठी मात्र मुलांना शाळा, कॉलेजमध्येच जावे लागेल. NIOS - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग हा सरकारचा उपक्रम आता अधिक व्यापक करावा लागेल. क्रीडा कौशल्यांवर मात्र याचा विपरित परिणाम होईल. कारण त्यात सोशल डिस्टन्सिंग राहणारच नाही. गायन, वादन, वक्तृत्व, नृत्य इत्यादी कलांचे मात्र शिक्षण घेता येईल. 

हेही वाचा- चाकरमान्यांबाबत सोशल मीडियावरील प्रचार खोटा ; उदय सामंत

 असंख्य शिक्षक बेरोजगार होतील

NIOS - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगप्रमाणेच फॉर्म 14 व 17 द्वारे विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या परीक्षा देता येतील. मर्यादित विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना कदाचित आपले वर्ग भरवता येतील. उपलब्ध जागा व विद्यार्थी संख्या याचे एक प्रमाण शासनाकडून ठरवले जाईल. त्या प्रमाणात काम करणाऱ्या शैक्षणिक संस्थानाच शासनाची परवानगी मिळेल. सर्व शिक्षण ऑनलाइन झाले की, असंख्य शिक्षक बेरोजगार होतील.

हेही वाचा- रोणापालमध्ये आकडा टाकून वीज चोरी

एकदा का सर्व व्हिडिओ तयार झाले की, शिक्षकांचे काय काम? मुलांचे व्यक्तिमत्व खुरटेल. कारण ते कायमच आभासी जगात राहतील. आताच Screen Addiction या सारख्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. रोबोट्‌सचे डीमांड प्रचंड वाढेल. कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रचंड वाव शैक्षणिक क्षेत्रात मिळेल. आत्ताच काही प्रगत देशांमध्ये शिक्षकांऐवजी रोबोट वापरणे चालू झाले आहे. विमान व गाडी चालवण्याचे प्रशिक्षण जसे कॉम्प्युटरवर घेता येते, तशी फिजिक्‍स, केमिस्ट्री प्रॅक्‍टिकलपण करता येतील व त्यापुढेही इंजिनिअरिंग व मेडिकल्सची प्रॅक्‍टिकल सहज सोपी होतील. 

संचालक, स्वामी विवेकानंद शैक्षणिक संस्था 
कोरोनानंतर आभासी शिक्षण पद्धत हाच पर्याय 

- मोहन भिडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Corona the virtual learning method is the only option