'सत्तांतरानंतर सर्वप्रथम कुंभार समाजाला विधीमंडळात प्रतिनिधित्व देणार'

पराग फुकणे 
सोमवार, 24 डिसेंबर 2018

रोहा :''आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होणारच यात मला शंका नाही. सत्तांतरानंतर सर्वप्रथम कुंभार समाजाला विधीमंडळातही प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्याचे तसेच माती कला मंडळाला स्वतंत्र निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्याचे आश्वासन'' राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी रोहा येथे दिले. विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व आमदार अनिकेत तटकरे आगामी अधिवेशनात कुंभार समाजाचे प्रश्न सभागृहात मांडतील अशी ग्वाही सुनील तटकरे यांनी दिली. रायगड जिल्हा कुंभार समाज समितीच्या वतीने आयोजित जिल्हा कुंभार समाजाच्या वधू वर मेळाव्याचे उद्घाटन व विद्यार्थी गुणगौरव राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी सुनील तटकरे बोलत होते.
 
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघाचे अध्यक्ष संजय गाते, माजी अध्यक्ष सुरेश हिरे, महिला आघाडी अध्यक्षा रसिका खेडेकर, कोकण विभाग अध्यक्ष महेश सायकर, माती कला मंडळ अध्यक्ष शरद वाडेकर, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, सभापती महेश कोलाटकर, गीता पडवळ, आदि उपस्थित होते. रोह्यातील कुंभार समाजाला त्यांचे कलागुणांना वाव देण्यासाठी योग्य ते नगरपालिकेच्या माध्यमातून संधी देण्यासाठी प्रयत्न करण्याचे तटकरे यांनी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांना सूचित केले.

जिल्हा व राज्यातील दहा निवडक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेण्याची ग्वाही तटकरेंनी दिली. आगामी काळात समाजाचे सभागृह उभारणीसाठी व त्यात समाजबांधवानी केलेल्या कलाकृतींचे कायमस्वरूपी प्रदर्शन ठेवण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक रायगड जिल्हा कुंभार समाज अध्यक्ष अनंत महाडकर यांनी केले. डाॅ चिंतामणराव देशमुख शहर सभागृहात आयोजित केलेल्या या मेळाव्याला जिल्हा भरातून पदाधिकारी, समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the establishment, the first Kumbhar community will be represented in the legislature