कोल्हापूर जिल्ह्यात धुव्वाधार सुरुच ; शनिवारपर्यंत राहणार पावसाचे संकट 

सुनील पाटील 
Wednesday, 14 October 2020

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून धुव्वाधार पाऊस सुरु आहे. भात, भुईमूग, सोयाबीन शेतात पाणी-पाणी झाल्याने मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात कालरात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. आज सकाळपासून इचलकंरजी, शिरोळ, हातकणंगले तालुक्‍यात जोरदार पाऊस झाला. तर, अकरानंतर संपूर्ण जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु राहिली आहे. शनिवार (ता. 17) पर्यंत पावसाचे संकट कायम असल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. राधानगरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. मात्र, धरणाची सर्व दरवाजे अद्याप बंद आहेत. धरणातून 700 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे 11.5 फुट पाणी पातळी आहे. 

जिल्ह्यात परितीचा पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. एक, दोन म्हणत आठवडा झाला एक सारखा आणि धुव्वाधार बरसत आहे. कधी संततधार तर कधी धुव्वाधार कोसळून शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरवत आहे. 

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून धुव्वाधार पाऊस सुरु आहे. भात, भुईमूग, सोयाबीन शेतात पाणी-पाणी झाल्याने मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. भात कापणी आणि सोयाबीन काढणीला गती आली असतानाच सुरु असलेल्या पावसाचा मोठा फटका बसत आहे.

हे पण वाचापरतीच्या पावसाने बळीराजाच्या डोळ्यात पाणी ; काढणीला आलेला भात पाण्यात

 काढणीला आलेल्या भात आणि भुईमूगाच्या शेतात पाणी आहे. त्यामुळे भात आणि भुईमूगाला कोंब फुटण्याची शक्‍यता आहे. यातच शनिवारपर्यंत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे. पावसामुळे भात कापणी, भुईमूग आणि सोयाबीन काढणी ठप्प झाली आहे. शेतकऱ्यांसह शेतमजूरांनाही रोजगारही उपलब्ध होवू शकत नाही, असे चित्र आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in kolhapur desert