esakal | हुश्श ! तब्बल दोन दिवसानंतर सुटला राजापूरचा वेढा
sakal

बोलून बातमी शोधा

after two days flood waters of Arjuna Kodavali rivers lifted Rajapur city

जनजीवन पूर्वपदावर ; भातखाचरात पाणी आणि चिखल

हुश्श ! तब्बल दोन दिवसानंतर सुटला राजापूरचा वेढा

sakal_logo
By
संदेश सप्रे

राजापूर (रत्नागिरी) : अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याचा राजापूर शहराला पडलेला वेढा तब्बल दोन दिवसानंतर सुटला आहे. त्यामुळे जवाहर चौक परिसराने मोकळा श्‍वास घेतला असली तरी अद्यापही कोदवली नदीच्या काठावरील टपर्‍या, बंदरधक्का आणि मुन्शी नाका परिसर पाण्याखाली आहे. रात्री उशिरा पुराचे पाणी ओसरल्यानंतर आज पूरस्थितीमुळे विस्कळित झालेले जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आले आहे. दोन दिवस पूरस्थिती असली तरी सतर्कतेमुळे व्यापार्‍यांचे फारसे नुकसान झालेले नाही. 


पुराचे पाणी ओसरताच बाजारपेठेतील दुकानांमध्ये पुरामुळे साचलेला चिखल काढून दुकानाची साफसफाई करण्यामध्ये व्यापारी गुंतले होते. पाण्याचा फवारा मारून पालिकेतर्फे चिखलाने भरलेल्या जवाहरचौकासह अन्य भागातील रस्त्यांची साफसफाई केली; शिवाजी पथ रस्ता, वैशपायंन पूल परिसरासह शहरातील अनेक भागातील रस्ते चिखलाने भरलेले आहेत. मुन्शी नाका परिसरातून शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव भागामध्ये सुरू असलेली वाहतूक ठप्प होती. 

हेही वाचा- कोरोनामुक्त मालवण शहरात अखेर कोरोनाचा शिरकाव -
अर्जुना-कोदवली नद्यांना पूर येऊन त्या पुराच्या पाण्याचा गेल्या दोन दिवसांपासून राजापूर शहराला वेढा पडला होता. शहर परिसरातील ग्रामीण भागातील रस्ते पुराच्या पाण्याखाली गेल्याने त्या गावांचा संपर्क तुटला होता. मात्र बुधवारी (ता. 5) सायंकाळपासून पावसाचा जोर थांबला. त्यामुळे रात्री नद्यांचे पाणी ओसरले. जवाहर चौकातील पुराचे पाणी ओसरले. अद्यापही शहरातील अनेक भाग पुराच्या पाण्याखाली आहे. नदीच्या काठावरील शीळसह अन्य गावांमधील रस्त्यासह भातशेतीमध्ये मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य आहे. शीळ येथील काही एकर भागातील भातशेती पाण्याखाली आहे.

हेही वाचा-अन् सुटकेचा नि:श्‍वास टाकत त्यांनी पुन्हा घेतली झेप -

शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव रस्ता पुराच्या पाण्याखाली असल्याने गेल्या दोन दिवसांपासून ठप्प असलेली वाहतूक तिसर्‍या दिवशीही कायम होती. या रस्त्यावरील काही ठिकाणचे पुराचे पाणी ओसरले असले तरी शीळ येथील श्री म्हसोबा देवस्थानच्या येथील सुमारे 50 वर्षापूर्वीचा पुरातन वृक्ष उन्मळून रस्त्यामध्ये कोसळला. त्यामुळे हा रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

संपादन - अर्चना बनगे
 

loading image