esakal | सिंधुदुर्ग पुन्हा चौथ्या टप्प्यात; हे राहणार सुरु, हे बंद
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग पुन्हा चौथ्या टप्प्यात; हे राहणार सुरु, हे बंद

सिंधुदुर्ग पुन्हा चौथ्या टप्प्यात; हे राहणार सुरु, हे बंद

sakal_logo
By
टीम ई सकाळ

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात (sindhudurg district) आरटीपीसीआर टेस्ट (RT-PCR test) केलेल्या कोविड बाधित रुग्णांचा मागील आठवड्यात 10 च्या खाली असलेला पॉझिटिव्हीटी रेट (positivity rate) पुन्हा 12.7 टक्के झाला आहे. राज्याच्या धोरणानुसार 10 टक्के पेक्षा जास्त रेट राहिल्याने जिल्ह्याचा पुन्हा चौथ्या टप्प्यात समावेश झाला आहे. त्यामुळे लॉकडाउनबाबत (lockdown) प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी सुधारित आदेश काढले आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून हे आदेश लागू झाले आहेत. नवीन सुधारित आदेश येईपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.

सिंधूदुर्ग जिल्हा कोरोना संक्रमणात रेड झोनमध्ये होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने उपाययोजना आखत जिल्ह्याला रेड झोनमधून बाहेर काढले. 4 जूनला राज्याने कोरोना लॉकडाउनबाबत पाच स्तर जाहीर केले होते. यात सलग तीन आठवडे सिंधूदुर्ग चौथ्या स्तरात (fourth stage) होता. 21 पासून जिल्हा तिसऱ्या टप्प्यात आला होता. कोरोना टेस्टमध्ये 10 पेक्षा कमी बाधित व 60 टक्के पेक्षा कमी ऑक्सीजन बेड व्यापलेले असल्याने जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात झाला होता; मात्र तिसऱ्या टप्प्यात कार्यरत असताना जिल्ह्याचा बाधित रेट 12.7 टक्के झाल्याने या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पुन्हा चौथ्या टप्प्यात झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुधारित आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळ सर्व दिवशी सायंकाळी 4 वाजेपर्यंत राहिली आहे.

हेही वाचा: कोकणी तरुणाचा नाद खुळा! परिस्थितीशी दोन हात करुन जोपसला अभिनयाचा छंद

अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना यांच्या वेळा सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत करण्यात आल्या आहेत. ही दुकाने शनिवार व रविवार बंद राहतील. रेस्टॉरंटस सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के आसन क्षमतेनुसार व सायंकाळी 4 नंतर पार्सल सेवा चालू राहील. शनिवार व रविवार फक्‍त पार्सल व होम डिलेव्हरी सुविधा चालू राहील. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, फिरणे, सायकलींग सोमवार ते शुक्रवार सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरु राहतील. आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी बंद राहतील. शासकीय कार्यालये सहीत (सुट असलेली खाजगी कार्यालये) 25 टक्के उपस्थितीसह सुरु राहतील. खेळ, मैदानी खेळांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत परवानगी असेल. आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी बंद राहतील. धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक, करमणुकीचे कार्यक्रम, मेळावे बंद राहतील. लग्न समारंभ जास्तीत जास्त 25 लोकांच्या उपस्थितीत होईल. अंत्ययात्रा, अंतविधी जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत होईल.

बैठका, निवडणूक–स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा 50 टक्के क्षमतेसह घेता येतील. बांधकाम ज्या ठिकाणी कामगारांच्या राहणेची सोय असेल अशी बांधकामे सुरु राहतील. कृषि व कृषि पुरक सेवा सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. वस्तू व सेवा फक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या ई कॉमर्स सेवा सुरु राहतील. जमावबंदी, संचारबंदी लागू राहणार असून व्यायामशाळा, केश कर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लरस, स्पा, वेलनेस सेंटर्स 50 टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरु राहतील. या दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी पुर्व नियोजित वेळ ठरवून तसेच एसी सुरु न करण्याच्या अटीवर सुरु राहतील. या ठिकाणी फक्त लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींनाच सेवा देणे बंधनकारक राहील.

हेही वाचा: मंत्रिमंडळात का चिकटलाय? निलेश राणेंचा वडेट्टीवार यांना सवाल

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसेस) 50 टक्के क्षमतेसह सुरु राहतील. माल वाहतूक प्रवाशांना लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमीत सुरु राहतील. खाजगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे प्रवाशांचा आंतर जिल्हा प्रवास नियमीत सुरु राहतील; परंतू या वाहनामधून स्तर पाचमध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यामध्ये प्रवाशी थांब्यावर उतरणार असलेस त्या प्रवाशास ई-पास बंधनकारक असेल.

loading image
go to top