गोवा-सिंधुदुर्ग बाॅर्डर सील झाल्याची ती अफवाच...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

सावंतवाडी, दोडामार्ग, बांदा परिसरातील ६० टक्के युवक दररोज नोकरीनिमित्त गोव्यात ये-जा करतात. गोव्यात जाण्यास बंदी करण्यात आल्याचे संदेश फिरल्याने या युवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

बांदा (सिंधुदुर्ग) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा-सिंधुदुर्ग सीमा सील करण्यात आलेली नाही. अशा प्रकारचे कोणतेही आदेश अद्याप पर्यंत वरिष्ठांकडून प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे, अशी माहिती सातार्डा व पत्रादेवी येथील तपासणी नाक्यावर तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे. कालपासून सोशल मीडियावर फिरत असलेल्या अफवांमुळे गोव्यात नोकरीनिमित्त जाणाऱ्या युवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

हेही वाचा- खुशखबर : पहिली ते आठवीचे विद्यार्थी डायरेक्ट पुढच्या वर्गात...

युवकांमध्ये निर्माण झाला  संभ्रम​
  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काल रात्रीपासून सिंधुदुर्ग-गोवा सीमा सिम केल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत होते. सावंतवाडी, दोडामार्ग, बांदा परिसरातील ६० टक्के युवक दररोज नोकरीनिमित्त गोव्यात ये-जा करतात. गोव्यात जाण्यास बंदी करण्यात आल्याचे संदेश फिरल्याने या युवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

वाहनचालकांना काळजी घेण्याचे आवाहन

हेही वाचा- मी त्यांना ॲडमिट व्हा म्हणालो,पण त्या स्वतःच क्‍वारंटाईन झाल्या... म्हणून झाला हा गोंधळ....
गोवा सीमेवरील दोन्ही तपासणी नाक्यांवर विचारणा केली असता, वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. नाक्यावर वाहनचालकांना काळजी घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: against the corona not been sealed Goa-Sindhudurg border kokan marathi news