खुशखबर : पहिली ते आठवीचे विद्यार्थी डायरेक्ट पुढच्या वर्गात...

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 21 मार्च 2020

पावणेदोन लाख विद्यार्थी पुढच्या वर्गात..पहिली ते आठवी परीक्षा रद्दचा निर्णय; पाल्यांच्या अभ्यासाबाबत ‘अलर्ट’ची गरज... 

कोल्हापूर : पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थी परीक्षा न देताच पुढच्या वर्गात जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या एक लाख ६५ हजार, तर महापालिकेच्या नऊ हजार ८२२ विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाचा निर्णय स्तुत्य असून, पालकांना पाल्याच्या अभ्यासाबाबत अलर्ट राहावे, असा सूर शिक्षण क्षेत्रातून आज व्यक्त झाला.

हेही वाचा- परदेशावरून येणाऱ्यासाठी इथे चेक पोस्ट

पावणेदोन लाख विद्यार्थी पुढच्या वर्गात

पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा दरवर्षी १० ते २० एप्रिलदरम्यान होतात. शिक्षक वर्गाकडून उत्तरपत्रिकांची तपासणी व प्रगतीपुस्तके तयार करण्याचे काम ३१ एप्रिलपर्यंत पूर्ण केले जाते. त्यानंतर ५ किंवा ७ मेस निकाल जाहीर केला जातो. शाळेचा पहिला दिवस १५ जूनला सुरू होतो. कोरोनाच्या प्रादुर्भावाने यंदा ३१ मार्चपर्यंत शाळांना सुट्टी दिली असली, तरी कोरोनाचे रुग्णांच्या संख्येत राज्यात वाढ होत आहे. त्यामुळे यंदा पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्याची घोषणा झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील घटकांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, ३१ मार्चपर्यंत दिलेल्या सुट्टयांमुळे विद्यार्थ्यांच्या डोक्‍यातून अभ्यास विस्मरणात जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यासाठी पालकांनी अलर्ट राहून त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे, असा सूर व्यक्त झाला.  

दृृष्टिक्षेपात
 जिल्हा परिषद एकूण शाळा- १९८१
 प्राथमिक- १९७७
 माध्यमिक- ४
 महापालिका- ५९ 
   (ऊर्दू माध्यम- ५) 

हेही वाचा-  Coronavirus : रविवारी जनता कर्फ्यू  : काय सुरू; काय बंद राहणार... वाचा

पहिली ते आठवी परीक्षा रद्दचा निर्णय

पहिली व दुसरीकरिता प्रत्येकी दोन, तिसरी व चौथीकरिता प्रत्येकी चार, तर पाचवी ते आठवीकरिता प्रत्येकी सहा विषय आहेत. सर्व विषयांचा अभ्यासक्रम शिकवून झाला आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याचे दिवस आहेत. पहिली चाचणी, सहामाही, घटक चाचणी झाली. त्यातून विद्यार्थ्यांचे आम्ही वर्षभर मूल्यमापन केले आहे. परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी पालकांनी पाल्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये.  
- उत्तम गुरव, मुख्याध्यापक, लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर

हेही वाचा-  चीनचा कच्चा माल बंद झाल्याने `या` कंपनीचे उत्पादन घटले

पाल्यांच्या अभ्यासाबाबत ‘अलर्ट’ची गरज

परीक्षेसाठी थोडा खर्च होत होता. परीक्षा रद्द झाल्याने त्यात आता कपात झाली आहे. आठवी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यावर आम्ही त्याला प्रमाणपत्र देतो. ती यंदाही द्यावी लागतील. तसेच, मुलांची प्रगतीपुस्तके वर्षभरात केलेल्या मूल्यमापनानुसार द्यावी लागणार आहेत. 
- अनिल चव्हाण, शिक्षक, वि. स. खांडेकर प्रशाला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decision to cancel 1st to 8th Exam kolhapur marathi news