खेडमधील नागरिक आक्रमक

खेडमधील नागरिक आक्रमक

rat९p७.jpg :
२४M८८९७६
खांबतळे येथे तुंबलेले गटार.

गटार तुंबल्यामुळे
खेड नागरिक आक्रमक

खेड ः पावसाळा सुरू होण्यापूर्वी खेडमधील गटार, नालेसफाईमध्ये नगर पालिका कर्मचारी गुंतलेले आहेत; मात्र खेड-दापोली मार्गावरील खांबतळे येथील गटार तुंबून वाहत असल्यामुळे दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत. स्वच्छता करण्याचा नारा देत पालिका शहर स्वच्छ करत असताना मात्र गटाराची स्वच्छता करण्यास कुणाला सवड मिळत नाही. हा विरोधाभास आहे. या ठिकाणी असलेल्या गटाराजवळ सिमेंट स्लॅब टाकण्यात येत असल्याने येथील गटार वारंवार तुंबते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे पालिका कानाडोळा करत आहे.

--

rat९p३.jpg -
P२४M८८९७२
साडवली - आपत्ती विभागाकडून आयोजित प्रात्यक्षिकात सहभागी कर्मचारी व अधिकारी.

आपत्ती विभागाकडून
मेघी बावनदीत प्रात्यक्षिक

साडवली ः देवरूख जवळील मेघी बावनदी येथे आपत्कालीन स्थितीत बुडणाऱ्‍याला कसे वाचवावे, याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. देवरूख पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या नियोजनात हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. मेघी बावनदी येथे राजू काकडे हेल्प अॅकॅडमीचे कार्यकर्ते, सोहम लाड मित्रमंडळ व देवरूख पोलिस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. या वेळी आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. आपत्कालीन साहित्यासह बुडणाऱ्‍याला कसे बाहेर काढावे, पाण्यात अडकलेल्या माणसांना कसे बाहेर काढावयाचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. देवरूख पोलिस ठाणे, राजू काकडे हेल्प अॅकॅडमी, देवरूख नगरपंचायत देवरूख, पंचायत समिती आपत्कालीन विभाग यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आपत्तीवेळी संपर्क नंबरही जाहीर करण्यात आले आहेत
------------
महावितरण कारभाराविरोधात
तुरळवासीय आक्रमक

संगमेश्वर ः संगमेश्वर तालुक्यातील तुरळ शाखेच्या अखत्यारितील ग्राहक महावितरणच्या अनागोंदी कारभाराला चांगलेच वैतागले असून, या विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. नेहमी खंडित होणारा वीजपुरवठा, गंजलेले वीजखांब, सदोष वीजवाहिन्या, अनियमित वीजबिले अशा विविध समस्यांनी येथील ग्राहक त्रासले आहेत; मात्र महावितरणचा अनागोंदी कारभार मात्र असाच सुरू आहे. पावसाळी हंगाम सुरू झाला तरीही महावितरणकडून विद्युतवाहिन्यांभोवती वाढलेल्या झाडाची साफसफाई झाली नसल्याचे दिसून येते. महावितरणकडून हे काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले जात असले तरी अनेक ठिकाणी ही झाडी अशीच धोकादायक स्थितीत वाढलेली असल्याचे दिसून येते. यामुळे पावसाळ्यामध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो तसेच या वाहिन्यांवर झाडे पडून वीजवाहिन्या तुटण्याचे प्रकार घडून येतात. वीजबिल वसुलीवर कर्मचारी पाठवून अशा गंभीर बाबींकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महावितरणचा अनागोंदी कारभार असाच सुरू राहिला तर मात्र जनतेला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही. तरी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये तत्काळ सुधारणा करून ग्राहकांना सुरळीत सेवा द्यावी, अशी रास्त अपेक्षा ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.
----------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com