अलिबागच्या पांढऱ्या कांद्यास जीआय मिळवण्यासाठी करार

राजेंद्र घोरपडे
Friday, 21 June 2019

दापोली - अलिबागच्या पांढऱ्या कांद्यास भौगोलिक मानांकन (जीआय) मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यासंदर्भात दापोली येथील डाॅ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठ, रायगड येथील आत्मा विभाग आणि ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी यांच्यामध्ये आज करार करण्यात आला आहे.

दापोली - अलिबागच्या पांढऱ्या कांद्यास भौगोलिक मानांकन (जीआय) मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यासंदर्भात दापोली येथील डाॅ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठ, रायगड येथील आत्मा विभाग आणि ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी यांच्यामध्ये आज करार करण्यात आला आहे.

या समन्वय करारामुळे अलिबाग येथील पांढऱ्या कांद्यास जीआय मिळविणे सोपे होणार आहे.  भारतातील वैशिष्ट पूर्ण पदार्थ असलेल्या आणि विशेष करून औषधी गुणधर्म असलेल्या अलिबाग पांढरा कांद्याची जीआय नोंद होणे गरजेचे आहे. यामुळे या कांद्यास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळविण्यासाठी मदत होणार आहे. त्यासाठीच हा करार झाला असून यातून एकत्र प्रयत्न करणे निश्चित झाले आहे. 

अलिबागच्या पांढऱ्या कांद्यास जीआय संदर्भात मागील एक वर्षापासून प्रयत्न सुरू आहोत. यासाठी कांदा उत्पादक गावांची निवड केली आहे. या गावातील शेतकरी स्वतःचे बी स्वतः तयार करतात. या पांढऱ्या कांद्याची वैशिष्ट्ये टिकून आहेत. लाल कांदा आपण भाजीसाठी वापरतो.  पण हा  पांढरा कांदा मात्र कच्चा खाल्ला जातो. यामध्ये तिखटपणा खूप कमी आहे. जीआयच्या प्रक्रियेमध्ये या कांद्याचे गुणधर्म टिकवण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. यातील रासायनिक घटनाकाचे पृथकरण होणार आहे.  यासाठी अलिबाग येथील माती व हवेतील गुणधर्मांचाही अभ्यास यात होणार आहे. 
- डाॅ. जितेंद्र कदम,
कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) माॅडेलप्रमाणे आता कृषी क्षेत्रातही कार्य सुरू होत आहे. अशा पद्धतीने कृषी विद्यापीठ आणि आत्मासोबत एकत्रित करार होणे हे शेती क्षेत्रासाठी क्रांतीकारी पाऊल आहे. निश्चितच आता अशा पद्धतीने कार्य करण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठात होणाऱ्या संशोधनाच्या विस्तारास यामुळे चांगली मदत होईल. याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. 
- गणेश हिंगमिरे,
तज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aggrument for GI to Alibaug white onion