चिखल आंघोळीने कळणेत आत्मक्‍लेश 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

कळणे - धोकादायक बनलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ येथे आज स्थानिकांनी आत्मक्‍लेश आंदोलन केले. यावेळी खचलेल्या बाजूपट्टीवर बसून आंदोलकांनी स्वतःवर चिखल ओतून घेतला. सुमारे पाच तास आंदोलकांनी चिखल अंगावर घेऊन ठिय्या मांडला. अखेर पोलिस उपनिरीक्षकांनी मध्यस्थी केली. बांधकाम विभाग, जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक शुक्रवारी (ता. 26) कळणेत घेण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

जलवाहिनीच्या कामामुळे बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या बाजूपट्टीची दुरवस्था झाली आहे. कळणे, आडाळीत अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. कळणे डबीवाडी बसथांब्यावर काही दिवसांपूर्वी बाजूपट्टी दोन फुटांनी खचली होती. बांधकाम विभागाने दुर्लक्ष्य केले. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी बाजूपट्टीवर वृक्षारोपण केले; परंतु आठ दिवस झाले तरी बाजूपट्टी पूर्ववत करण्यात आली नाही. वारंवार मागणी करूनही धोकादायक बनलेल्या रस्त्याची डागडुजी करण्याकडे दुर्लक्ष्य केले जात आहे. बांधकाम विभाग व जीवन प्राधिकरण एकमेकांकडे बोट दाखवत अंग झटकट आहेत. चार दिवसांपूर्वी फोंडियेकडे जाणारा जोडरस्ता खचला. त्यामुळे फोंडियेचा मार्ग बंद झाला. 

अखेर संतापलेल्या ग्रामस्थांनी कळणेत आत्मक्‍लेश आंदोलन केले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ नाडकर्णी, आडाळी ग्रामपंचायत सदस्य पराग गावकर, कळणे ग्रामपंचायत सदस्य अजित देसाई यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी स्वतःवर चिखल ओतून घेतला. चिखल अंगावर घेऊन खचलेल्या बाजूपट्टीवर सुमारे पाच तास ठिय्या दिला. पोलिस उपनिरीक्षक सुजित घाटगे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर बांधकामच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. आज (ता.26) सकाळी 11 वाजता कळणेत दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन तोडगा काढण्याच्या मुद्द्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य अजय देसाई, शिवसेना शाखाप्रमुख पुरुषोत्तम देसाई, राजन कळणेकर आदींनी चिखल ओतून घेतला. माजी सरपंच आनंद देसाई, सुनीता भिसे, संजय विर्नोडकर, प्रवीण गावकर, ब्रिजेश नाईक, विजय कळणेकर, केदार भिसे, बापू नाईक, प्रवीण नाईक, प्रशांत नाईक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation in Kalne in Sindhudurg