"ईव्हीएम' हटावसाठी सिंधुदुर्गनगरीत आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

सिंधुदुर्गनगरी - भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीतर्फे आज संपूर्ण राज्यात सुरू केलेल्या "ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव' आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. 

या आंदोलनाची सुरूवात सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर भारिप व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी घंटानाद करून व घोषणा देवून केली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर यांनी या आंदोलनाची पार्श्‍वभूमी सांगून ईव्हीएम मशिनमुळे राज्यात व देशभरात मतदानात कसा घोष झाला याची माहिती दिली. ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी हा घोळ निवडणूक आयोगाच्या पुराव्यासह निदर्शनास आणूनही त्याची दखल न घेतल्याने हे आंदोलन करण्यात आले असल्याचे सांगितले. या आंदोलनाची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. 

या आंदोलनात संघटनेचे महासचिव प्रमोद कासले, महिला आघाडी प्रमुख भावना कदम, तेजस पडवळ, मोहन जाधव, सत्यवान जाधव, प्रभाकर साळसकर, अंकुश जाधव, पी. डी. कदम आदी उपस्थित होते. तर यापुढे बॅलेट पेपरनेच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी निवेदनातून केली. मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना सुपूर्द केले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation for removal EVM in Sindhudurg