esakal | नारळाच्या कलाकृतीतून होत आहे रोजगार निर्मीती ; कोकणकरांचा उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

agricultural university of konkan exhibition on the occasion of coconut day in konkan

नवतरुणांना अशा टाकाऊ भागापासून कलाकृती तयार करण्यास प्रेरणा मिळू शकते

नारळाच्या कलाकृतीतून होत आहे रोजगार निर्मीती ; कोकणकरांचा उपक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दाभोळ : नारळाचे खोड, झाप, नारळ, काथ्या, करवंट्या आदींचा वापर करून विविध कलाकृती रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात, याचा पडताळा देणारे प्रदर्शन जागतिक नारळ दिनाचे औचित्य साधून दापोलीत भरवण्यात आले होते. यातून प्रेरणा घेऊन नवतरुणांना अशा टाकाऊ भागापासून कलाकृती तयार करण्यास प्रेरणा मिळू शकते, हा दृष्टिकोन ठेवून प्रदर्शन भरविण्यात आले.

हेही वाचा - काजू खरेदी करताय ? मग ही बातमी वाचाच...

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाअंतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, दापोलीमार्फत हे प्रदर्शन आयोजित केले. प्रदर्शनामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यातील व दापोलीतील स्थानिक कलाकारांच्या कलाकृती मांडल्या होत्या. या प्रदर्शनाला उपविभागीय कृषी अधिकारी दीपक कुटे, शेखर कदम, मोरे, गव्हे येथील उद्योजक विजय गोळे हे उपस्थित होते. यावेळी डॉ. संतोष वरवडेकर यांनी संपादित केलेल्या नारळाची सापशिडीचे प्रकाशन डॉ. संजय भावे यांच्या हस्ते करण्यात आले. 

प्रदर्शनामध्ये श्रावणी सूर्यवंशी, स्वरा गोरिवले, महेंद्र भांबीड, अमोल म्हसकर, राजेंद्र आग्रे, राजेश गोरिवले,  अशोक तोडकरी, सचिन लिमये, अनंत पवार, दिलीप विरनोडकर, किरण खिलारी, शीतल कातकर, विठोबा काळसेकर, जान्हवी लोंढे, क्षितिज बुरटे, शिल्पा नाईक, राजेश दिवेकर, साक्षी झगडे, शुभ्रा झगडे या कलाकारांनी प्रदर्शनात कलाकृती मांडल्या होत्या. प्रदर्शनाला १०० हून अधिक जणांनी भेट दिली असून हे प्रदर्शन खास लोकाग्रहास्तव पुढील चार ते पाच दिवस सर्वांसाठी खुले राहणार आहे.

हेही वाचा - हे गाव चालविण्याची जबाबदारी दरवर्षी मिळते तिघांना; इथे आजही कबुलायतदार गावकर व्यवस्था...

ध्वनी चित्रफितीचे उद्‌घाटन

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी केलेल्या मदतकार्य आणि तांत्रिक मार्गदर्शन यावर आधारित ध्वनी चित्रफितीचे उद्‌घाटन प्रगतिशील शेतकरी विनायक महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. संतोष वरवडेकर यांनी ती तयार केली.

संपादन - स्नेहल कदम