Agriculture Day Special : पारंपरिक भातशेती परवडेना; रत्नागिरीकरांनी निवडला नवा मार्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 पारंपरिक भातशेती परवडेना; रत्नागिरीकरांनी निवडला नवा मार्ग

पारंपरिक भातशेती परवडेना; रत्नागिरीकरांनी निवडला नवा मार्ग

रत्नागिरी: पारंपरिक पीक म्हणून भातशेतीकडे पाहिले जाते पण भातशेतीत खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती, नोकरीसाठीचे वाढते स्थलांतर यामुळे शेतीकडील कल गेल्या दहा वर्षात कमी झाल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे गावाकडे परतलेल्यांनी शेतीची कास धरली आहे; मात्र तो टक्का नगण्य आहे. शेतीऐवजी मोकळ्या जागांवर जिल्ह्यात फळबागायतीला Orchards प्राधान्य दिले जात आहे. (agriculture-day-special-farmer-growing-trend-towards-fruit-cultivation-in-ratnagiri-kokan-agriculture- marathi-news)

जिल्ह्याचं सध्याचे भातशेतीखालील क्षेत्र ६७ हजार ७७९ हेक्टर इतके आहे. २००९ ला हेच क्षेत्र ७१ हजार हेक्टरपर्यंत होते. गेल्या दहा वर्षांमध्ये त्यात सर्वसाधारणपणे चार हजार हेक्टरची घट झाली आहे. गावातील तरुण शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी मुंबई, पुण्याची वाट धरतात. त्यामुळे अनेकांची भातशेती लागवडीविनाच राहते. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे गावी परतलेले चारकमानी शेतीकडे वळल्याचे दिसत होते; परंतु हा टक्का कमीच असल्याचे कृषी विभागाच्या अखेरच्या तपासणी अहवालातून दिसून आले. भातशेतीपेक्षा मोकळ्या जागांवर फळबागायतीला प्राधान्य देणार्‍यांची संख्या वाढलेली आहे. गेल्या दहा वर्षातील फळ लागवडीत सुमारे दीड हजार हेक्टर भातक्षेत्र असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

आंबा, काजूसह नारळ, सुपारीमधून उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळू शकते. महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा), रोजगार हमीसारख्या शासकीय योजनांमधून अनुदानावर लागवड करता येते. वातावरणाच्या बदलात आंबा सापडत असला तरीही आंबा उत्पादनातून गुजराण चालण्याइतपत फायदा शेतकर्‍यांना होतो. काजू पिकाचीही तिच स्थिती आहे. औषधाच्या फवारणीचा खर्च कमी आणि उत्पादनही बर्‍यापैकी मिळते. मनरेगा योजनेतून गेल्या पंधरा वर्षात १५ हजार ३४९ हेक्टर व फळ बागायतींची लागवड करण्यात यश आले आहे. यामध्ये काजूखालील क्षेत्र ७० टक्के आहे.

हेही वाचा- गिनिज बुकात नावलौकिक मिळवलेल्या,मालकाला कर्जमुक्त करणाऱ्या  ‘गज्या’चा मृत्यू

गेल्या वर्षीही कोरोनाच्या परिस्थितीत मनरेगामधून फळ बागायतीसाठी प्रस्ताव सादर करणार्‍यांची संख्या सकारात्मक आहे. गेल्या दहा वर्षात ५५ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यात खर्च झाला आहे. रत्नागिरी फलोत्पादन जिल्हा म्हणून घोषित झाला आहे. त्या अनुषंगाने नियोजन केले जात आहे.

गेल्या काही वर्षात पिक पद्धतीत बदल होताना दिसत आहे. फळबाग लागवडीला महत्व देत असून त्यातून उत्पन्नाचे साधन मिळत आहे.

- विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी

२००९ ते २०२० मधील फळ बागायती लागवड

फळपिक क्षेत्र (हेक्टर)

* आंबा १,४७१.७०

* काजू १३,०६७.४५

* नारळ ५६.२०

* चिकू ०१.५६

* इतर ७५२.७१

Web Title: Agriculture Day Special Farmer Growing Trend Towards Fruit Cultivation In Ratnagiri Kokan Agriculture Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..