

Nitesh Rane
sakal
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सुरुवातीला काजू व आंब्यासाठी प्रत्येकी २०,० अशा एकूण ४०० शेतकऱ्यांची निवड करून हा प्रकल्प सुरू केला जाईल. यात आंबा आणि काजू उत्पादकांचा समावेश असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरेमंत्री नीतेश राणे यांनी दिली.