आजरा : मॉन्सूनपूर्व (Monsoon) पाऊस जोरात आहे. अशा पावसात पर्यटक (Tourist) पावसाचा आनंद लुटत आहेत. आजऱ्यापासून दीड किलोमीटर अंतरावरील रामतीर्थावर पर्यटकांची गर्दी झाली आहे. काळ्या पाषाणावरून रोरावत कोसळणारा हिरण्यकेशी नदीवरील (Hiranyakeshi River) प्रसिद्ध धबधबा पाहण्यासाठी व पावसाच्या थेंबातून मातीचा पसरलेला सुगंध घेण्यासाठी आतुरलेल्या पर्यटकांची पावले रामतीर्थाकडे वळत आहेत.