Ajit Pawar: संभाजी महाराजांच्या स्मारकास भरघोस निधी: उपमुख्यमंत्री अजित पवार, स्मारकाच्या क्षेत्रांतील मंदिरांचे जतन

कर्णेश्वर हे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराचे काम आजही उत्तम दर्जाचे आहे. या मंदिरांचे पावित्र्य टिकविले पाहिजे. महाराजांच्या स्मारकाच्या पाच एकर क्षेत्रांमधील नदीच्या काठावरील मंदिरांचे जतन केले जाईल.
ajit pawar
ajit pawarsakal
Updated on

संगमेश्वरः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या माध्यमातून कोकणाला भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल. राष्ट्रीय पातळीचे स्मारक करताना हेरिटेज टच देऊन टिकाऊ स्मारक उभारा. संभाजी महाराजांचे स्मारक उभारताना स्थानिकांना न दुखवता काम करा. सोमवारपासून काम सुरू करा, निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कसबा येथे दिली.

तसेच कर्णेश्वर हे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराचे काम आजही उत्तम दर्जाचे आहे. या मंदिरांचे पावित्र्य टिकविले पाहिजे. महाराजांच्या स्मारकाच्या पाच एकर क्षेत्रांमधील नदीच्या काठावरील मंदिरांचे जतन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. संभाजी महाराजांच्या स्मारकाची आणि सरदेसाई यांच्या वाड्याची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी आढावा बैठक घेतली. संगमावरील मंदिरांची पाहणी केली. याप्रसंगी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्यावेळी पुरातत्त्व विभागाचे स्थापत्य अभियंता नागेश्वर यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर केले.


पवार म्हणाले, ‘स्थानिकांना जागेचा मोबदला देऊन काम करून घ्या. चांगल्या दर्जाचे काम करणाऱ्या दोन ठेकेदारांकडून स्मारकाचे काम करून घेतले जाईल. स्थानिक पातळीवरील नकाशे, अन्य बाबी लवकरात लवकर पूर्ण करून मला माहिती द्या, याठिकाणी जांभा दगड टिकत नाही असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे जांभा दगडाची तपासणी करून दगड वापरावा, तसेच स्मारकासाठी चांगल्या दर्जाचे टिकाऊ असेल असेच साहित्य वापरा. देशासह परदेशी पर्यटक स्मारक पाहायला येतील त्यामुळे स्मारकाच्या ठिकाणी माहिती फलक हे मराठी, हिंदी, इंग्लिश भाषेत लावावेत, येथील नदीचे आणि धरणाचे काम करण्यात येणार आहे.’


दरम्यान, कसबा ते शृंगारपूर असे पर्यटनस्थळ विकास करावा. तसेच, नायरी घाट फोडून नायरी - पाटण - सातारा असा जवळचा मार्ग लवकर निर्माण करावा त्यासाठी उपमुख्यमंत्री यांनी लक्ष देण्याची मागणी आमदार शेखर निकम यांनी केली. राजेंद्र महाडिक यांनी पुरातन मंदिराची दुरुस्त करावी, असे सांगत यासंदर्भात निवेदन दिल्याचे सांगितले.
कार्यक्रमावेळी पालकमंत्री उदय सामंत, बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, प्रमोद जठार आदी उपस्थित होते.

पर्यटकांना चांगल्या सुविधा द्या
छत्रपती संभाजी महाराजांची जयंती, पुण्यतिथी आणि राज्याभिषेक झाला त्या दिवशी शिवप्रेमी, पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतील. त्यामुळे कसबा येथे पर्यटक जास्त वेळ थांबण्यासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्या. जिल्ह्यात अनेक गड, किल्ले आहेत. त्यांच्या प्रतिकृती स्मारकाच्या परिसरात ठेवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी केल्या. वाड्याजवळ संभाजी महाराजांच्या काळातील प्रसंग दाखविणाऱ्या प्रतिकृती उभाराव्यात असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

चित्रीकरणावेळी माध्यमांना थांबविले
कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी करीत असताना माध्यमांना शूटिंग करताना रोखण्यात आले. आम्हाला काम करू द्या, अरे थांबा ना बाबा मराठीत सांगितलेले कळत नाही का, तुम्ही त्रास दिला तर निघून जाईन, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगत चित्रीकरण थांबविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Suhas Shirsath Makes First Demand As MLC Seeks Land For Sambhaji Maharaj Equestrian Statue In Phulambri
First full size statue of Ajit Pawar in Baramati
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial Sangameshwar
Marathi News Esakal
www.esakal.com