राज्य सरकारचे आदेश ; गड-किल्ल्यांवर मद्यपान केल्यास भोगावी लागणार अशी शिक्षा अन् एवढा दंड, ....

विनोद दळवी
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

राज्य शासनाने पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाला आदेश काढत राज्यातील गड-किल्ल्यांवर मद्यपान करून गैरप्रकार करणाऱ्या समाजकंटकांवर दारूबंदी अधिनियमानुसार कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

ओरोस (सिंधुदुर्ग) : पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गातील गड-किल्ल्यांवर यापुढे मद्यपान करून गैरवर्तन केल्यास किमान तीन महिने कारावास व पाच हजार रुपये आर्थिक दंड,  शिक्षा भोगावी लागणार आहे. कारण राज्य शासनाने पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाला आदेश काढत राज्यातील गड-किल्ल्यांवर मद्यपान करून गैरप्रकार करणाऱ्या समाजकंटकांवर दारूबंदी अधिनियमानुसार कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले आहेत. उत्पादनशुल्क विभागाने जिल्ह्यातील गड-किल्ल्यांची माहिती घेण्यास सुरवात केली आहे.

त्यामुळे आता गड-किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांवर करडी नजर राहणार आहे.
याबाबतचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी सुधाकर यादव यांनी काढले आहेत. या आदेशात महाराष्ट्रातील गड-किल्ले हे महाराष्ट्रातील सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत. या गडकिलल्यांचे पावित्र्य राखणे गरजेचे आहे; मात्र गडकिल्ल्यांना भेटी देताना काही समाजकंटक मद्याचे सार्वजनिक ठिकाणी सेवन करतात. मद्य पिऊन सार्वजनिक शांततेस बाधा आणली जाते. गैरप्रकार, गैरवर्तन, गड किल्ल्यांच्या वैभवशाली पुरातन 

गडकिल्ल्यांवर मद्यपान पडणार महागात

वास्तुचे नुकसान करणे. पावित्रय भंग करण्याचा प्रयत्न करणे, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा समाज कंटकांना आळा बसावा. यासाठी मद्य प्राशन करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही, अशा सार्वजनिक ठिकाणी दारुच्या नशेत गैरशिस्तीने वागल्यास महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ च्या २५ मधील कलम ८५ अन्वये कारवाई करावी, असे नमूद केले आहे.

हेही वाचा- बापरे ! हा शब्द डावलल्याने चक्क शिक्षकांची पेन्शन रद्द..
कोणत्याही जागी लोकांना प्रवेश मिळतो. त्या जागी दारुच्या नशेत गैरवर्तन केल्यास ते दोषी ठरू शकतात. अशा प्रकारे त्यांनी पहिला अपराध केल्यास सहा महिन्यापर्यंत सश्रम कैदेची व दहा हजार रूपये आर्थिक दंडाची शिक्षा होवू शकते. न्यायालय ही शिक्षा पुरेसे कारण न मिळाल्यास तीन महिन्यापर्यंत आणून ५ हजार रूपये शिक्षा ठोठावू शकते. हाच अपराध दुसऱ्यांदा केल्यास एक वर्ष सश्रम कैद व दहा हजार रूपये दंड होवू शकतो. दुसऱ्या गुह्यात मात्र कैदेची शिक्षा सहा महिन्यांच्या खाली येणार नसुन तीन हजार रूपये दंड कमी होवून तो सात हजार पर्यंत येवू शकतो. 

हेही वाचा-  निर्यातवृद्धीसाठी क्‍लस्टर : आंबा, काजूची निर्यात वाढविण्यासाठी या सहा जिल्ह्यांची निवड..

मनाईचे फलक गड-किल्ल्यांवर लावणार
शासन आदेशात गड-किल्ल्यांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे २५ मधील कलम ८५ अन्वये गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती देणारे फलक पुरातत्त्व विभागाने गड-किल्ल्यांवर लावावेत, अशा सक्त सूचना दिल्या आहेत. फलक लावल्यावर, असा प्रकार केल्यास तत्काळ पोलिस अथवा राज्य उत्पादनशुल्क विभागाने कारवाई करावी, असेही या आदेशात नमूद आहे.

हेही वाचा-  “मुख्यमंत्री ठाकरेंना त्यावेळी थंडी वाजत होती का?” ​
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड-किल्ले
सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, महादेवगड, मनसंतोषगड, नारायणगड, रांगणागड, यशवंतगड, सावंतवाडी राजवाडा, कुडाळ कोट, भगवंतगड, सर्जेकोट, पद्मगड, देवगड, सिद्धगड, भगवानगड, रामगड, सदानंदगड, डच दरबार, गगनगड, भरतगड, शिवगड, खारेपाटण किल्ला, बांदा किल्ला, हनुमंतगड, पारगड, सोनगड, वेताळगड, भैरवगड, राजकोट, मनोहरगड, निवती किल्ला असे गड-किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. या सर्व किल्ल्यांवर मद्यपींच्या हालचालींवर करडी नजर राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alcohol prices will be expensive on fortresses kokan marathi news